अभिनेता एजाज खान याला मुंबई पोलिसांकडून अटक; Tik Tok फेम फैजूच्या समर्थनार्थ बनवला होता व्हिडिओ
Ajaz Khan | (Photo Credits: Facebook)

बॉलिवुड अभिनेता एजाज खान (Ajaz Khan) याला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. मुंबई पोलिसांच्या सायबर सेल विभागाने ही कारवाई केली. एजाज खान याने बनवविलेल्या Tik Tok व्हिडिओ प्रकरणी पोलिसांनी (Mumbai Police) ही कारवाई केली. टिकटॉक 07 ग्रुपमध्ये तबरेज अन्सारी मॉब लिंचिंग प्रकरणात एक व्हिडिओ बनविण्यात आला होता. या व्हिडिओचे समर्थनक करत एजाज खान याने या प्रकरणात उडी घेतली होती. तसे, फैजू नावाच्या एका व्यक्तिविरोधात सायबर सेलकडे तक्रारही केली होती. तसेच, या प्रकरणाबाबत एक व्हिडिओ बनवून मुंबई पोलिसांची खिल्लीही उडवली होती, असा खान याच्यावर आरोप आहे.

एजाज खान याच्याद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेल्या व्हिडिओत त्याने बॉलिवुडमधील काही चित्रपटांतील डायलॉगची मिमिक्री करुन मुंबई पोलिसांची खिल्ली उडवली होती. इंडिया टीव्ही दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, या व्हिडिओत त्याने सात आरोपींमध्ये तो त्या सात आरोपींसोबत दिसला होता ज्यात तबरेज अन्सारी याच्या मृत्यूनंतर बनविण्यात आलेल्या टिक टॉक व्हिडिओत म्हटले होते की, जर कोणी मुस्लिम दहशतवादी बनला तर काही बोलू नका.

दरम्यान, मुंबई पोलिसांतील वरिष्ठ अधिकाऱ्याने प्रसारमाध्यमांना सांगितले की, आम्ही एजाज खान याला अटक केली आहे. तसेच, लवकरच त्याला न्ययालयासमोर हजर करण्यात येईल. (हेही वाचा, जान्हवी कपूर हिला कार्तिक आर्यन नाही तर 'या' अभिनेत्याला Kiss करण्याची इच्छा)

मुंबई पोलीस ट्विट

एजाज खान याने असेही म्हटले होते की, टिक टॉकने घातलेली बंदी उठवावी. तसेच, एजाजला आजही असे वाटते की त्याने आणि त्याच्या सोबतच्या लोकांनी जे केले त्यात चुकीचे काहीच नव्हते. त्याने केवळ आपला कॉन्टेंट वापरला आणि लोकांनी त्याच्या मुसलमान असण्यावर अशा पद्धतीने प्रश्न उपस्थित केला ही, हा व्हिडिओ देशासाठी अत्यंत भडकाऊ आहे.