Aishwarya Rajinikanth

सुपरस्टार अभिनेते रजनीकांत (Rajinikanth) यांची मुलगी दिग्दर्शिका ऐश्वर्या रजनीकांतच्या (Aishwarya Rajinikanth) यांच्या घरातून लाखो रुपये किंमतीच्या दागिन्यांची काही दिवसापुर्वी चोरी झाल्याची घटना घडली होती. या प्रकरणाची पोलीस तक्रार करण्यात आल्यानंतर पोलीस या प्रकरणाचा तपास करत होते. आता या प्रकरणी पोलिसांनी (Chennai Police) दोन जणांना अटक केली असून हे दोघेही ऐश्वर्या रजनीकांत यांच्या घरात काम करणारे कर्मचारी असल्याचे समोर आले आहेत. या प्रकरणी आता घरातील मोलकरीण आणि ड्रायव्हरला चोरीच्या गुन्ह्यात पोलिसांना अटक करण्यात आली आहे.  (CM Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 6 एप्रिलला अयोध्या दौऱ्यावर जाणार)

काही दिवसापुर्वी ऐश्वर्या रजनीकांत यांनी पोलिसांत केलेल्या तक्रारीत तीन लाखांपेक्षा जास्त किंमतीचे दागीने चोरी गेल्याचे म्हटले होते. यानंतर आयपीसी कलम 381 नुसार, पोलीस या प्रकरणाची चौकशी करत होते.  हे सर्व दागिने लॉकरमध्ये ठेवले होते. या लॉकरमधूनच हे दागिने गायब झाल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसात तक्रार करण्यात आली होती. आता या प्रकरणी चेन्नई पोलिसांनी ऐश्वर्या रजनीकांतच्या घरातील मोलकरीण ईश्वरी आणि ड्रायव्हर व्यंकटेश यांना अटक केली.

ईश्वरी ऐश्वर्या रजनीकांतच्या घरात गेल्या अनेक वर्षापासून कामाला होती. यामुळे ईश्वरीला घरातील लॉकरच्या चावीबाबात पूर्ण माहिती होती. ड्रायव्हरच्या सांगण्यावरुन इश्वरीने ही चोरी केल्याची माहिती पोलिसांनी दिली. आपल्या घर खरेदीसाठी या दागिन्यांचा वापर ईश्वरीने केला असल्याचे पोलिसांनी सांगत घराचे कागदपत्रेही जप्त करण्यात आल्याचे सांगण्यात आले.  ऐश्वर्याची बहिण 2019 मध्ये लग्नबंधनात अडकली. या लग्नानंतर दागिने  तीने लॉकरमध्ये ठेवले होते. त्यानंतर दागिने असलेलं लॉकर तीन ठिकाणी हलवण्यात आलं. 2019 ते 2021 पर्यंत हे लॉकर सेंट मेरी रोड येथील अपार्टमेंटमध्ये होतं. त्यानंतर ते सीआयटी कॉलनीत हलवण्यात आलं. सीआयटी कॉलनीत ऐश्वर्या धनुषसोबत राहत होती. धनुषपासून विभक्त झाल्यानंतर ते लॉकर पुन्हा रजनीकांत यांच्या पोइस गार्डन रेसिडेन्समध्ये हलवण्यात आले होते.