Eknath Shinde | (Photo Credit - Twitter)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि शिवसेनेचे (Shivsena) आमदार आणि खासदार हे 6 एप्रिलला अयोध्या दौऱ्यावर (Ayodhya Tour) जाण्याची शक्यत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या या दौऱ्याच्या या अयोध्या दौऱ्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरु आहे. काही दिवसापुर्वीच महाराष्ट्राचे एक शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या पुर्वतयारीसाठी अयोध्येमध्ये भेट देऊन आले.  या दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शरयू नदीकाठी (Sharayu River) धार्मिक विधींमध्ये भाग घेणार आहे. मुख्यमंत्रीपदाची सुत्रे हातात घेतल्यानंतर एकनाथ शिंदे यांचा हा पहिलाच अयोध्या दौरा असणर आहे. (Raj Thackeray Gudi Padwa Speech: 'बाळासाहेबांना सोडून कुणाला 'धनुष्य' पेलणार नाही'; शिवसेनेती फूट, सत्तांतर ते माहीम मध्ये उभारला जात असलेला अनधिकृत दर्गा पहा राज ठाकरेंनी केलेले महत्त्वाचे गौप्यस्फोट)

शिवसेनेत बंडखोरीच्या पुर्वी एकनाथ शिंदे हे आदित्य ठाकरे यांच्यासोबत अयोध्या दौऱ्यावर गेले होते. अयोध्या दौऱ्यावर जाताना खासदार श्रीकांत शिंदे आणि त्यांच्यासोबत शिवसेनेच्या आमदार आणि खासदारांनाही घेऊन जाण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हा अयोध्या दौरा राजकीय रणनितीचा एक भाग असल्याचे म्हटले आहे. एकनाथ शिंदे हे 40 आमदारांसह जूनमध्ये बंड केले होते. तेव्हापासून शिवसेना दोन गटात विभागली गेली आहे. उद्धव ठाकरे हिंदुत्ववादापासून दुरावले असून त्यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत केलेल्या आघाडीबद्दल नाराजी व्यक्त करत त्यांनी हा बंड केला होता. तसेच हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मागील तीन दशकांपासून शिवसेना आणि भाजप एकत्र होते.

अयोध्येच्या राम मंदिराचा मुद्दा महाराष्ट्राच्या राजकारणात महत्त्वाचा मुद्दा बनला आहे. राज्यातलं सत्तानाट्य आणि एकनाथ शिंदेंचं बंड यानंतर अयोध्या दौऱ्याचा विषय मागे पडला होता. मात्र, आता पुन्हा अयोध्या दौऱ्याचा विषय चर्चेत आला आहे. तोही एकनाथ शिंदे यांच्यामुळं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लवकरच अयोध्या दौऱ्यावर जाणार असल्यानं या दौऱ्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे.