Aishwarya Rai Bachchan Viral Post: ऐश्वर्या राय बच्चनने आई आणि वडिलांसाठी लिहिला हृदयस्पर्शी संदेश; सोशल मीडियावर व्हायरल होतीय पोस्ट
Aishwarya Rai And her Mom-Dad (PC - Instagram)

Aishwarya Rai Bachchan Viral Post: बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan) सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. कौटुंबिक समस्यांदरम्यान ऐश्वर्या रायने सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे, जी तिच्या पालकांसाठी आहे. ऐश्वर्याने तिची आई आणि दिवंगत वडिलांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर एक सुंदर पोस्ट शेअर केली आहे. ऐश्वर्या राय बच्चन सोशल मीडियावर कमी अॅक्टिव्ह असते. परंतु, ती काही प्रसंगी पोस्ट करत असते. अलीकडेच, ऐश्वर्याने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर तिच्या पालकांचे फोटो शेअर केले आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. एक फोटो ऐश्वर्याच्या आई-वडिलांच्या तारुण्याच्या दिवसातील आहे, तर दुसरा फोटोही थ्रोबॅक आहे.

हे फोटो शेअर करताना ऐश्वर्या राय बच्चनने कॅप्शनमध्ये लिहिले, 'माझे प्रिय आई-पप्पा आणि डॅडी-आज्जा, मी तुम्हा दोघांवर खूप प्रेम करते. तुमच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त तुमच्यासाठी प्रार्थना आणि तुमच्यावर खूप प्रेम. गॉड ब्लेस.' (हेही वाचा - Amitabh Bachchan Unfollow Aishwarya Rai Bachchan? अमिताभ बच्चन यांनी सून ऐश्वर्याला इन्स्टाग्रामवर अनफॉलो केल? काय आहे सत्य? जाणून घ्या)

ऐश्वर्याचे बच्चन कुटुंबाशी भांडण?

ऐश्वर्या राय बच्चनचे तिच्या सासरच्यांसोबतचे संबंध बिघडल्याच्या बातम्या काही दिवसांपासून येत होत्या. सासू-सासऱ्यांसोबतच्या मतभेदाचा परिणाम तिच्या अभिषेकसोबतच्या नात्यावर होत असल्याचं बोललं जात आहे. मीडिया रिपोर्ट्समध्ये असेही म्हटले आहे की ऐश्वर्याने बच्चन कुटुंबाचे घरही सोडले आहे. मात्र, काही काळापूर्वी ऐश्वर्या तिची मुलगी आराध्या बच्चनच्या वार्षिक समारंभात पती अभिषेक बच्चन आणि सासरे अमिताभ बच्चन यांच्यासोबत दिसली होती. ऐश्वर्याचे बच्चन कुटुंबाशी मतभेद आहेत की नाही याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. (हेही वाचा - बॉलिवूड कपल Aishwarya Rai आणि Abhishek Bachchan घेणार घटस्फोट? दोघांचे नाते बिनसल्याची सोशल मिडियावर चर्चा)

ऐश्वर्याच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, ती शेवटी पॅन इंडिया चित्रपटाच्या पहिल्या आणि दुसऱ्या भागात दिसली होती. या चित्रपटांमधील अभिनेत्रीच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले होते.