![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2018/10/abhishek-bachchan-aishwarya-rai-bachchan-784x441-380x214.png)
चित्रपटसृष्टीमधील लोकांच्या डेटींगच्या, ते एकत्र येऊन विभक्त होत असल्याचे अनेक बातम्या दररोज कानी पडत असतात. आता बॉलिवूडमधील लव्हेबल कपल समजले जाणारे ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन (Aishwarya Rai And Abhishek Bachchan) यांच्याबाबत एक बातमी व्हायरल होत आहे. गेल्या काही काळापासून बॉलिवूडचे पॉवर कपल ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांच्या नात्यात काहीतरी बिनसले असून, हे कपल घटस्फोट घेणार असल्याची अफवा सोशल मीडियावर पसरली आहे.
अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन हे बॉलिवूडचे आयडॉल कपल मानले जाते, अशा परिस्थितीत दोघांच्या घटस्फोटाच्या व्हायरल झालेल्या बातमीमुळे अनेक चाहत्यांना धक्का बसला आहे. काही मीडिया रिपोर्ट्समध्ये असाही दावा केला जात आहे की अभिषेस्क आणि ऐश्वर्या यांच्यामध्ये आधीच घटस्फोट झाला आहे. मात्र अजूनतरी याबाबत अधिकृतरीत्या काही माहिती मिळू शकली नाही.
काही दिवसांपूर्वी बिझनेस टायकून मुकेश अंबानी यांनी मुंबईत नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर (NMACC) च्या उद्घाटन समारंभाचे आयोजन केले होते. ज्यामध्ये देश-विदेशातील अनेक स्टार्स उपस्थित राहिले होते. यावेळी जागतिक सौंदर्यवती ऐश्वर्या राय बच्चनही तिची मुलगी आराध्या बच्चनसोबत पोहोचली. मात्र इव्हेंटच्या दोन्ही दिवशी अभिषेक बच्चन ऐश्वर्यासोबत दिसला नाही. त्यानंतरच लोकांनी या जोडप्यात सर्व काही ठीक नाही असा अंदाज लावला. त्यावरूनच दोघेही लवकरच घटस्फोट घेणार असल्याच्या बातम्या व्हायरल झाल्या. (हेही वाचा: Kiccha Sudeep: कन्नड अभिनेता किच्चा सुदीप कर्नाटक निवडणुकीत भाजपचा करणार प्रचार, निवडणूक लढवण्याच्या प्रश्नावर दिले हे उत्तर)
या सर्व बातम्यांमध्ये अभिनेता अभिषेक बच्चनचे एक ट्विट व्हायरल होत आहे. ज्याने या सर्व अफवांचे स्पष्ट खंडन केले आहे. ऐश्वर्या रायच्या एका चाहत्याने अंबानींच्या NMACC पार्टीतील ऐश्वर्या राय आणि आराध्याचा फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये त्या या दोघी आपल्या आवडत्या असल्याचे म्हटले होते. या फोटोवर अभिषेक बच्चनने कमेंट करत 'मी टू!' असे लिहिले आहे. म्हणजेच या दोघीही माझ्याही आवडत्या असल्याचे अभिषेकचे म्हणणे आहे.