CM Eknath Shinde Meets Salman Khan: गोळीबाराच्या घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली सलमान खानची भेट (Watch Video)
CM Eknath Shinde Meets Salman Khan (PC- X/ANI)

CM Eknath Shinde Meets Salman Khan: बॉलिवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan)च्या मुंबईतील (Mumbai) वांद्रे येथील निवासस्थानाबाहेर दोन जणांनी गोळीबार केल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आज अभिनेत्याची भेट घेतली. एकनाथ शिंदे यांनी सलमान खान आणि त्याचे वडील सलीम खान यांची गॅलेक्सी अपार्टमेंटमधील त्यांच्या घरी भेट घेतली आणि कुटुंबाच्या सुरक्षेचे आश्वासन दिले. यावेळी माजी आमदार बाबा सिद्दीकी, आमदार जीशान सिद्दीकी, युवासेनेचे राहुल कनाल हेही उपस्थित होते.

सलमान खान आणि त्याच्या कुटुंबीयांना देण्यात येणारे सुरक्षा कवच सरकार वाढवणार असल्याचे यावेळी एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. सलमान खानच्या सुरक्षेची ग्वाही देताना मुख्यमंत्री म्हणाले की, आमचे सरकार राज्यात अंडरवर्ल्ड टोळीच्या कोणत्याही हालचाली सहन करणार नाही. (हेही वाचा -Salman Khan House Firing: सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार करणाऱ्या दोन्ही शूटर्संना 10 दिवसांची पोलिस कोठडी)

पहा व्हिडिओ -

रविवारी सकाळी वांद्रे येथील बॉलीवूड अभिनेत्याच्या घराबाहेर गोळीबार करणाऱ्या दोघांना मुंबई पोलिसांनी अटक केल्यानंतर काही तासांतच शिंदे यांनी सलमान खानची भेट घेतली. विकी गुप्ता (24) आणि सागर पाल (21) अशी आरोपींची नावे असून त्यांना गुजरातच्या कच्छ जिल्ह्यातील एका गावातून अटक करण्यात आली.