नेहा कक्कड़ आणि रोहनप्रीत सिंह (Image Credit: Yogen Shah)

Neha Kakkar-Rohanpreet Singh Wedding: बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका नेहा कक्कड़ (Neha Kakkar) हिने 24 ऑक्टोबर रोजी तिचा प्रियकर रोहनप्रीत सिंहसोबत (Rohanpreet Singh) लग्न केले. या दोघांच्या लग्नाची सोशल मीडियावर बरीच चर्चा झाली. नेहा कक्करने पंजाबी रूढीनुसार रोहनप्रीतबरोबर लग्न केले. नेहा आणि रोहनप्रीतचे संगीत समारंभांपासून लग्नापर्यंतचे सर्व व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले. त्यांच्या ड्रीम वेडिंगनंतर हे जोडपे आता मुंबईला परत आले आहेत. मुंबई विमानतळावर पापाराझीने नेहा, रोहनप्रीतसह त्यांच्या संपूर्ण कुटुंबीयांना स्पॉट केलं. यावेळी नेहा आणि रोहनप्रीतच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळाला.

मुंबई विमानतळावरून समोर आलेल्या चित्रात नेहा आणि रोहनप्रीत अत्यंत कॅज्युअल लूकमध्ये दिसले. या प्रवासात दोघांनीही त्यांच्या कम्फर्ट लक्ष दिले. यावेळी नेहा लाइनिंग ड्रेसमध्ये दिसली. तसेच रोहनप्रीत स्पोर्टी लूकमध्ये दिसला. त्याने पांढरा टीशर्ट आणि ब्लू ट्रॅक पेंट परिधान केली होती. यावेळी, त्यांच्या चेहर्‍यावरील आनंद त्याच्या हृदयाची स्थिती दर्शवत होता. (हेही वाचा - Neha Kakkar-Rohanpreet Singh Wedding: नेहा कक्कड़ चे सासरी झाले ढोल-ताशांच्या गजरात जंगी स्वागत, पाहा धमाल Videos)

 

View this post on Instagram

 

#nehakakkar with husband #rohanpreetsingh Clicked at airport today. #yogenshah @yogenshah_s

A post shared by yogen shah (@yogenshah_s) on

यापूर्वीही नेहाचा तिच्या सासरच्या घरी पोहोचल्यानंतरचा व्हिडिओ समोर आला होता. यात व्हिडिओमध्ये नेहाचं तिच्या सासरच्या लोकांनी ढोल-ताशांच्या गजरात जंगी स्वागत केल्याचं पाहायला मिळालं होतं. दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून नेहा आणि रोहनप्रीतच्या रिलेशनशीपची चर्चा सुरू होती. मात्र, हे दोघे लग्न करणार का? असा प्रश्न त्यांच्या चाहत्याला पडला होता. अखेर नेहा आणि रोहनप्रीतने लग्नगाठ बांधली व आपल्या चाहत्याला लग्नाची गोड बातमी दिली. सध्या रोहनप्रीत आणि नेहा मुंबईमध्ये आपल्या कुटुंबासह आले आहेत.