Neha Kakkar-Rohanpreet Singh Wedding: नेहा कक्कड़ चे सासरी झाले ढोल-ताशांच्या गजरात जंगी स्वागत, पाहा धमाल Videos
Neha Kakkar And Rohanpreet Wedding (Photo Credits: Instagram)

Neha Kakkar-Rohanpreet Singh Wedding: दिलबर, हाय गरमी, आंख मारे सारखी हिट गाणी देणारी सुप्रसिद्ध गायिका नेहा कक्कड़ (Neha Kakkar) नुकतीच रोहनप्रीत सिंह (Rohanpreet Singh) याच्यासोबत विवाहबंधनात अडकली. नवी दिल्लीत मोठ्या थाटात मोजक्या लोकांच्या उपस्थितीत हा शाही विवाहसोहळा पार पडला. या सोहळ्याचे रोका सेरेमनी (Roka ceremony), मेहंदी (Mehendi), हळदी सेरेमनी (Haldi Ceremony) सर्वच गोष्टी सोशल मिडियावर व्हायरल होत होत्या. त्यानंतर तिच्या लग्नाचे अनेक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाले होते. आता तिचा लग्नानंतरचा तिच्या सासरी झालेल्या गृहप्रवेशाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. नेहा कक्कड़ चे तिच्या सासरी ढोल-ताशांच्या गजरात जंगी स्वागत करण्यात आले.

या व्हिडिओमध्ये तिच्या सासरी घराबाहेर ढोल-ताशांच्या गजरात स्वागत होताना दिसत आहे. यात ती आणि तिचा नवरा रोहनप्रीत सुद्धा ठेका धरताना दिसत आहे.

त्याचबरोबर गृहप्रवेशानंतर घरात त्या दोघांचा अंगठी शोधण्याचा कार्यक्रम झाला. या सर्व खेळांमध्ये नेहा आणि रोहनप्रीत सह त्याच्या सर्व कुटूंबियांनी देखील धमाल उडवून दिली. हेदेखील वाचा- Neha Kakkar Sings Live for Husband Rohanpreet Singh Video: नेहा कक्कड़ आणि रोहनप्रीत सिंह यांच्या लग्नात सजली सूरांची मैफिल, रोमँटिक गाणे गाताना दिसले हे कपल

नेहा कक्कड़ च्या लग्नात अभिनेत्री उर्वशी रौतेला, उर्वशी ढोलकिया सह काही ठराविक कलाकार उपस्थित होते. नेहा, तिचे कुटूंब आणि रोहनप्रीत ने आपल्या गाण्याची छान मैफिल रंगवून आलेल्या पाहुण्यांचे मनोरंजन केले.