Rowdy Baby Video Song (PC - YouTube)

Rowdy Baby Video Song: तमिळ सुपरस्टार आणि रजनीकांतचा जावई धनुष (Dhanush) याच्या गाण्याने एक नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे. त्याच्या मारी 2 या चित्रपटाच्या रौडी बेबी (Rowdy Baby) गाण्याने यूट्यूबवर 1 अब्जपेक्षा जास्त म्हणजेचं एक कोटीपेक्षा जास्त व्यूज मिळाले आहेत. हा चित्रपट 2018 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात धनुष आणि कृष्णा मुख्य भूमिकेत आहेत. विशेष म्हणजे या यशामुळे धनुषने आनंदित होऊन ट्विट केलं आहे. यात त्याने म्हटलं आहे की, 'किती सुंदर योगायोग. कोलावेरी दी गाण्याच्या नवव्या वर्धापनदिनानिमित्त राऊडी बेबी या गाण्याला एक अब्जाहून अधिक व्यूज मिळाले आहेत. एक अब्ज व्यूज मिळणारे हे दक्षिण भारतीय गाण्यातील एकमेव गाणं आहे, हे सांगताना आम्हाला अभिमान वाटतो. आमची संपूर्ण टीम तुमचे मनापासून आभार मानत आहे,' असंही धनुषने म्हटलं आहे.

धनुष आणि धी यांनी मारी 2 च्या राउडी बेबी गाण्याला आवाज दिला आहे. हे गाणे 25 ऑक्टोबर 2018 रोजी प्रसिद्ध झालं होतं. या गाण्याचे संगीत युवा शंकर राजा यांनी दिले होते. या गाण्याचे बोल धनुष यांनी लिहिले होते. हे गाणे आता युट्यूबमधील सर्वाधिक पाहिले जाणारे गाणे बनले आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी असाच इतिहास धनुषच्या कोलावेरी दी या गाण्याने बनवला होता. हे गाणे धनुषच्या 2011 सायकॉलॉजिकल थ्रिलर 3 मधील होते. 16 नोव्हेंबर 2011 रोजी रिलीज झालेले हे गाणे देशभर खूप लोकप्रिय झाले. तमिळ आणि इंग्रजीमध्ये लिहिलेले त्याचं गाण चाहत्यांमध्ये एक फिनोमेना बनलं होतं. हे गाणं धनुष यांनी लिहिले व गायिलेले होते. तसेच त्याचे संगीत अनिरुद्ध रविचंदर यांनी केले होते. तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी धनुष यांना खास पाहुणे म्हणून आमंत्रित केले यावरून या गाण्याची लोकप्रियता समजते.  (हेही वाचा - Aditya Roy Kapur याच्या वाढदिवसा दिवशी नव्या सिनेमाची घोषणा, डिसेंबर 2021 मध्ये होणार प्रदर्शित)\

धनुष आता आनंद एल रॉयच्या अतरंगी रे या चित्रपटात सारा अली खान आणि अक्षय कुमारसोबत दिसणार आहे. रॉय यांच्या रांझणा या चित्रपटापासून त्यांनी हिंदी चित्रपटात करिअरची सुरुवात केली होती. त्यात सोनम कपूरने मुख्य भूमिका साकारली होती. या चित्रपटातील धनुषच्या कामाचे कौतुक झाले होते. यानंतर तो आर बाल्कीच्या शमिताभ या चित्रपटात अमिताभ बच्चनसोबत दिसला होता.