Aditya Roy Kapur याच्या वाढदिवसा दिवशी नव्या सिनेमाची घोषणा, डिसेंबर 2021 मध्ये होणार प्रदर्शित

झी स्टुडिओ प्रस्तुत या अहमद खान (Ahmed Khan) आणि शायरा खान (Shaira Khan) निर्मिती करणार आहेत. या चित्रपटाचे शूटिंग पुढील महिन्यापासून सुरु होईल.

Aditya Roy Kapur याच्या वाढदिवसा दिवशी नव्या सिनेमाची घोषणा, डिसेंबर 2021 मध्ये होणार प्रदर्शित
Aditya Roy Kapur (Photo Credits: Instagram)

'आशिकी 2' या चित्रपटातून प्रचंड लोकप्रियता मिळविणारा बॉलिवूड अभिनेता आदित्य रॉय कपूर (Aditya Roy Kapur) आज आपला 35 वा वाढदिवस साजरा करत आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या चाहत्यांसह संपूर्ण सिनेसृष्टीकडून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. यातच वाढदिवसाचे औचित्य साधून त्याच्या नव्या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. चित्रपट समीक्षक तरण आदर्श (Taran Adarsh) याने ट्विटच्या माध्यमातून या सिनेमाबद्दल माहिती दिली आहे. या चित्रपटाचे नाव 'ओम-द बॅटल विदिन' (Om-The Battle Within) असं या चित्रपटाचे नाव आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन कपिल वर्मा (Kapil Verma) यांनी केले आहे. हा चित्रपट डिसेंबर 2021 मध्ये प्रदर्शित होईल असेही सांगण्यात येत आहे.

झी स्टुडिओ प्रस्तुत या अहमद खान (Ahmed Khan) आणि शायरा खान (Shaira Khan) निर्मिती करणार आहेत. या चित्रपटाचे शूटिंग पुढील महिन्यापासून सुरु होईल. चित्रपट समीक्षक तरण आदर्श याने ट्विटच्या माध्यमातून याबाबत माहिती दिली आहे. हेदेखील वाचा- Happy Birthday Aaradhya Bachchan: अमिताभ बच्चन आपल्या परिवारासह साजरा करत आपली नात आराध्याचा 9 वा वाढदिवस, बिग बीं शेअर केले नातीचे हे क्युट फोटोज

या चित्रपटात आदित्य रॉय कपूरसह दिशा पटानी आणि तारा सुतारिया असणार असल्याची चर्चा आहे. मात्र याबाबत कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. नुकताच आदित्य लुडो या सिनेमात दिसला. OTT प्लेटफॉर्म हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे.

आशिकी 2 करण्यापूर्वी आदित्यने लंडन ड्रिम्स, अॅक्शन रिप्ले, गुजारिश या चित्रपटात काम केले होते. मात्र हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर सपशेल आपटले. त्यानंतर आलेल्या 'आशिकी 2' चित्रपटाने आदित्यला ओळख मिळवून दिली. त्याचबरोबर ये जवानी है दिवानी हा हिट चित्रपट देखील त्याच्या पारड्यात पडला.

(The above story first appeared on LatestLY on Nov 16, 2020 04:58 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).