Happy Birthday Aaradhya Bachchan: अमिताभ बच्चन आपल्या परिवारासह साजरा करत आपली नात आराध्याचा 9 वा वाढदिवस, बिग बीं शेअर केले नातीचे हे क्युट फोटोज
अमिताभ बच्चन यांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून आपल्या लाडक्या नातीस वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या असून तिचे लहानपणापासूनचे खास फोटोज शेअर केले आहे. या फोटोमध्ये आराध्याचे बालपण झळकत आहे.
बॉलिवूडमधील प्रतिष्ठीत कुटूंबापैकी एक मानला जाणारा बच्चन परिवाराच्या घरी आज आनंदाचे वातावरण आहे. त्याला कारणही तितके खास आहे. अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांची लाडकी नात आराध्या (Aaradhya) हिचा आज 9 वा वाढदिवस आहे. तिच्या वाढदिवसानिमित्त आज बच्चन परिवारात विशेष लगबग दिसत आहे. अमिताभ बच्चन यांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून आपल्या लाडक्या नातीस वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या असून तिचे लहानपणापासूनचे खास फोटोज शेअर केले आहे. या फोटोमध्ये आराध्याचे बालपण झळकत आहे.
बिग बी अमिताभ बच्चन यांनी आराध्याच्या जन्मापासून ती 9 वर्षापर्यंतचे तिचे क्युट फोटोज सोशल मिडियावर शेअर केले आहेत. अमिताभ सह आराध्याची आई सुप्रसिद्ध अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनने (Aishwarya Rai Bachchan) देखील आराध्याची सुरुवातीपासून खूप काळजी घेतली आहे. आपल्या बिझी शेड्यूलमध्येही तिने आराध्याला कधीही अंतर दिले नाही.हेदेखील वाचा- Parineeti Chopra: दिवाळीच्या फटक्यांमुळे अभिनेत्री परिणीती चोप्रा ठरली नेटकऱ्यांची शिकार; कारण घ्या जाणून
View this post on Instagram
त्यामुळे ऐश्वर्या देखील जेव्हा केव्हा फॅशन इव्हेंटमध्ये जाते तेव्हा आराध्याला सोबत घेऊन जाते. त्यामुळे आराध्या देखील आपल्या आईसह विदेश भ्रमंती करते. आराध्या मुंबईच्या धीरूभाई अंबानी इंटरनॅशल शाळेत शिकत आहे. याच शाळेत शाहरुखचा मुलगा अबराम आणि आमिर खानचा मुलगा आझाद देखील याच शाळेत शिकत आहे.
आराध्या हिचा जन्म हिचा एका उच्चभ्रू आणि नामांकित अशा बच्चन परिवारात झाल्याने तिला अनेकदा मिडियाच्या गराड्याचा सामना करावा लागतो. अशा वेळी आई ऐश्वर्या आणि बाबा अभिषेक तिची उत्तमरित्या काळजी घेतात.
गेल्या वर्षी आराध्याच्या वाढदिवसानिमित्त जंगी पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. यात शाहरुख आपला मुलगा अबरामसह करण जोहर आपल्या मुलांसह या पार्टीत उपस्थित होते. मात्र यंदा विशेष पार्टीचे आयोजन होणार की अगदी साध्या पद्धतीने हा बर्थडे साजरा केला जाणार हे याबाबत कोणतीही अधिकृत माहिती नाही.
(The above story first appeared on LatestLY on Nov 16, 2020 10:38 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

