Renuka Shahane Tests Positive For COVID-19: आशुतोष राणा नंतर रेणुका शहाणे ची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह; मुलांनाही झाला संसर्ग
Renuka Shahane, Ashutosh Rana (PC - Instagram)

Renuka Shahane Tests Positive For COVID-19: बॉलिवूड आणि टीव्ही जगातील अनेक कलाकार कोरोना साथीच्या विळख्यात सापडले आहेत. काही दिवसांपूर्वी अभिनेता आशुतोष राणा (Ashutosh Rana) यांना कोरोना विषाणूची (Coronavirus) लागण झाली होती. आता त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनादेखील कोरोना विषाणूचे संक्रमण झाले आहे. आशुतोष राणा यांची पत्नी रेणुका शहाणे (Renuka Shahane) आणि त्यांच्या दोन मुलाची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.

कोरोना विषाणूची दुसरी लाट देशभर वेगाने पसरत आहे. यामुळे बर्‍याच राज्यात मिनी किंवा संपूर्ण लॉकडाउन लागू करण्यात आले आहे. रेणुका शहाणे आणि तिची दोन मुले शौर्यमान आणि सत्येंद्र यांची कोरोना चाचणी सकारात्मक आली आहे. या सर्वांवी स्वत: ला होम क्वारंटाईन केलं असून ते पूर्ण काळजी घेत आहेत. शनिवारी संध्याकाळी रेणुका, शौर्यमान आणि सत्येंद्र यांचा रिपोर्ट आला. काही दिवसांपूर्वी रेणुकाचे पती आशुतोष राणा यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यानंतर त्यांनी आपल्या संपर्कात आलेल्यांना कोरोना चाचणी करण्याचे आवाहन केले होते. तसेच आशुतोष यांनी आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांची कोरोना चाचणी करून घेतली. यात त्यांची पत्नी आणि दोन मुलांना कोरोना विषाणूचे संक्रमण झाल्याचं आढळून आलं आहे. (वाचा - अभिनेता नील नितिन मुकेशसह दोन वर्षाची मुलगी COVID19 पॉझिटिव्ह, म्हणाला कोरोनाला हलक्यात घेऊ नका)

आशुतोष राणा यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं होत की, 'जगत्जननीची ही विशेष करुणा आहे की मला आज कळलं की, मला कोरोनाची लागण झाली आहे. या विकारापासून मुक्त होण्याच्या दिशेने मी प्रयत्न करत आहे. मला परम पूज्य गुरुदेव दद्दाजींनी आशीर्वाद दिला आहे. मी लवकरचं बरा होईल, असा माझा ठाम विश्वास आहे. मी माझ्या संपूर्ण कुटुंबाची चाचणी करून घेतली आहे. त्यांचा रिपोर्ट उद्या येईल. परंतु 7 एप्रिलनंतर माझ्या संपर्कात आलेल्या सर्व मित्र, हितचिंतक आणि चाहत्यांनी निडर व्हावे आणि आपली कोरोना चाचणी करून घ्यावी ही विनंती.'

दरम्यान, याआधी बॉलिवूडमधील अनेक कलाकारांना कोरोना साथीच्या आजाराचा फटका बसला आहे. यात रणबीर कपूर, आमिर खान, आलिया भट्ट, संजय लीला भन्साळी, अशी अनेक नावे आहेत. नुकतीच अर्जुन रामपाल आणि समीरा रेड्डी यांचीदेखील कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.