Salman Khan चा चित्रपट ‘राधे: योर मोस्ट वॉन्टेड भाई’ साठी अ‍ॅडव्हान्स बुकिंग सुरू; येथे करू शकता बुकिंग
Radhe Your Most Wanted Bhai (PC - Instagram)

सलमान खान (Salman Khan) चा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘राधे: योर मोस्ट वॉन्टेड भाई’ 13 मे रोजी रिलीज होणार आहे. अशा परिस्थितीत चित्रपटाचे अ‍ॅडव्हान्स बुकिंग सुरू झाले आहे. एसके फिल्म्सने यासंदर्भात इन्स्टाग्रामवर एक पोस्टर शेअर करत माहिती दिली आहे. एसके फिल्म्सने आपल्या अधिकृत इन्स्टाग्रामवर एक पोस्टर शेअर केली आहे, ज्यामध्ये त्यांनी सांगितले आहे की, राधे या चित्रपटासाठी मीडिल ईस्टसाठी अ‍ॅडव्हान्स बुकिंग सुरू करण्यात आले आहे. युएई, कतार, कुवैत, सौदी अरेबिया आणि बहरीनसाठी अ‍ॅडव्हान्स बुकिंग सुरू झाले आहे. सलमान खानच्या चित्रपटाचे अ‍ॅडव्हान्स बुकिंग सुरू झाले आहे! आपण व्हॉक्स सिनेमा, नोव्हो सिनेमा, रील सिनेमा आणि स्टार सिनेमा सारख्या स्थानिक सिनेमा वेबसाइटवरून आपले बुकिंग करू शकता. सुरक्षित रहा!

सलमानचा हा चित्रपट मध्यपूर्वेतील चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. यापूर्वी सलमानचे या चित्रपटातील 'सीटी मार' हे गाणे रिलीज करण्यात आले होते. त्यामध्ये सलमान दिशा पटानीसोबत डान्स करताना दिसत आहे. तसेच, त्याच्या गाण्याला यूट्यूबवर 50 कोटीहून अधिक व्यूज मिळाले आहेत. (वाचा -Radhe Song Dil De Diya Teaser: राधे चित्रपटातील 'दिल दे दिया' गाण्याचा टीजर आला समोर, भाईजानसह जैकलीन फर्नांडिस लावणार ठुमके)

 

View this post on Instagram

 

A post shared by Salman Khan Films (@skfilmsofficial)

प्रभुदेवा दिग्दर्शित या चित्रपटात सलमान खान पोलिस अधिकारी राधे या एन्कॉन्टर स्पेशलिस्ट अधिकाऱ्याची भूमिका साकारणार आहे. यात राधेने 97 एन्काउंटर केले आहेत. या चित्रपटात अभिनेत्री दिशा पटानी, रणदीप हूडा आणि प्रसिद्ध अभिनेता जॅकी श्रॉफ महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. सलमान खानचा हा चित्रपट ईडीच्या निमित्ताने 13 मे रोजी ओटीटी प्लॅटफॉर्म झी 5 वर रिलीज होणार आहे.