Tanushree Dutta Accident: अभिनेत्री तनुश्री दत्ताचा अपघात; मंदिरात जाताना गाडीचे ब्रेक झाले फेल
Tanushree Dutta Accident (PC - Instagram)

Tanushree Dutta Accident: बॉलिवूड अभिनेत्री तनुश्री दत्ता (Tanushree Dutta) चा नुकताच अपघात झाला. मिळालेल्या माहितीनुसार, तनुश्री महाकालच्या दर्शनासाठी जात असताना रस्त्यात अपघात झाला. अभिनेत्री तनुश्री दत्ताने स्वतः सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. अभिनेत्रीने तिच्या दुखापतीचा फोटो इंस्टाग्रामवर शेअर करून या घटनेबद्दल खुलासा केला.

तनुश्री दत्ताने तिच्या सोशल मीडियावर अनेक फोटो शेअर केले आहेत. यातील एक छायाचित्र अपघाताच्या वेळेचे आहे. या फोटोमध्ये अभिनेत्रीच्या पायावर जखमा स्पष्ट दिसत आहेत. या घटनेचे वर्णन करताना अभिनेत्रीने लिहिले, 'आजचा दिवस साहसी होता!! पण शेवटी महाकालाचे दर्शन झाले...मंदिराकडे जाताना विचित्र अपघात झाला...ब्रेक निकामी झाल्याने अपघात झाला.... फक्त काही टाके पडले आहेत...जय श्री महाकाल!' (हेही वाचा - Met Gala 2022: Natasha Poonawalla चा मेट गालामध्ये साडीतील गोल्डन लूक पाहून खिळल्या सर्वांच्या नजरा; पहा नताशाचा रेड कार्पेटवरील देसी ग्लॅमर अंदाज)

या अपघातात अभिनेत्रीच्या गुडघ्याला गंभीर दुखापत झाल्याचे चित्रांमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर अभिनेत्रीचे चाहते खूपच चिंतेत पडले आहेत. तनुश्रीच्या पोस्टवर यूजर्स कमेंट करत आहेत आणि तिला लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा देत आहेत.

तनुश्री दत्ताने 2005 मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. इमरान हाश्मीसोबत 'आशिक बनाया आपने' चित्रपटातून डेब्यू करणारी तनुश्री सध्या लाइमलाइटपासून दूर आहे.