Shilpa Shetty Accident: अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा मोडला पाय, रोहित शेट्टी याच्या 'इंडियन पुल‍िस फोर्स’ वेब सीरिजच्या चित्रिकरणादरम्यान

अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) हिला चित्रिकरणादरम्यान अपघात (Shilpa Shetty Accident) झाला. अपघातात तिचा पाय मोडला. त्यामुळे तिला रुग्णालयात दाखल व्हावे लागले. शिल्पा शेट्टी हिने आपल्या इन्स्टाग्राम पोस्टवर याबाबत माहिती दिली आहे. पायाला प्लास्टर घातलेल्या अवस्थेत व्हिल चेअरवरुन रुग्णालयाबाहेर पडतानाचे काही फोटोही शिल्पाने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. लवकर आराम मिळावा यासाठी चाहत्यांनी आपल्यासाठी प्रार्थना करावी असे अवाहनही शिल्पाने सोशल मीडियाच्या माध्यमातून केले आहे.

रोहित शेट्टी (Rohit Shetty) याच्या ‘इंडियन पुल‍िस फोर्स’ (Indian Police Force) या वेब सीरिजच्या चित्रिकरणादरम्यान शिल्पाला अपघात घडला. वय वर्षे 47 असले तरी शिल्पा अजूनही नवोदीत आणि तुलनेत तरुण असलेल्या अभिनेत्रींना टक्कर देते. सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करताना शिल्पा शेट्टीने म्हटले आहे की, चित्रिकरणादरम्यान 'रोल कॅमेरा अॅक्शन आणि "ब्रेक अ लेग! अशी दिलेली सूचना मी प्रत्यक्षात शब्दश: घेतली. त्यामुळे खरोखरच माझा पाय मोडला. आता मी 6 आठवड्यांसाठी या चित्रिकरणातून बाहेर राहणार असल्याचे ती म्हणते. विश्रांती घेऊन मी लवकरच तंदुरुस्त होऊन परतेल असेही ती म्हणाली. (हेही वाचा, International Yoga Day: Shilpa Shetty, Sara Ali Khan ते Malaika Arora, 7 बॉलीवूड अभिनेत्रींच्या नितळ सौंदर्याचे गुपित आले समोर, तुम्हीपण जाणून घ्या रहस्य)

इन्स्टा पोस्ट

दरम्यान, शिल्पाने ‘इंडियन पुल‍िस फोर्स’ या वेब सीरिजसाठी चित्रित केल्या जाणाऱ्या एका चित्रिकरणाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. यात रोहित शेट्टी हार्नेसला लटकत असताना मारामारीचे दृश्य चित्रित करताना दाखवण्यात आले होते. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिले, ‘इंडियन पुल‍िस फोर्स’ या वेब सीरिजच्या सेटवर कंटाळवाणा क्षण कधीही आला नाही!'

इन्स्टा पोस्ट

दरम्यान, ‘इंडियन पुल‍िस फोर्स’ या वेब सीरिजमध्ये सिद्धार्थ मल्होत्रा, विवेक ओबेरॉय आणि ईशा तलवार यांच्याही भूमिका आहेत. ही वेब सिरीज Amazon Prime Videos वर रिलीज होणार आहे. एप्रिलमध्ये, शिल्पाने वेब शोमधून तिचा लूक शेअर केला, जो रोहित शेट्टीच्या कॉप युनिव्हर्सचा एक भाग आहे .