International Yoga Day: योगचा प्रचार आणि प्रसार जगभर झाले आहे. योगाचे महत्व अनेकांना पटले आहेत, त्यामुळे अनेकजण नियमितपणे योगाभ्यास करत असतात, बॉलिवूड कलाकारही मागे नाहीत, 7 बॉलीवूड अभिनेत्रींच्या नितळ सौंदर्याचे गुपित समोर आले आहे, निरोगी राहण्यासाठी अभिनेत्री योगाभ्यास करते, या यादीमध्ये सगळ्याच्या आघाडीच्या अभिनेत्री आहेत. तंदुरुस्त आणि निरोगी राहण्यासाठी योगा करणाऱ्या सेलिब्रिटी पाहूयात...
करीना कपूर:-
View this post on Instagram
करीना फिटनेसकडे खूप लक्ष देते, करीना योग आणि त्याच्या फायद्यांबद्दल नेहमीच सांगत असते. करीन अनेकदा तिच्या इंस्टाग्रामवर विविध योगासने करतानाचे फोटो पोस्ट करत असते.
मलायका अरोरा :-
View this post on Instagram
मलायका अनेकदा तिचे योगा करतानाचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. मलायका अनेकदा तिच्या टोनड फिजिक आणि फिटनेस ने चाहत्यांना प्रभावित करते आणि मलायका फिटनेसचे संपूर्ण श्रेय योगाला देते, योगाचे फायदे सांगण्याची तिला खूप आवड आहे आणि तिचा मुंबईत योग स्टुडिओ देखील आहे.
सारा अली खान :-
View this post on Instagram
साराला वाटते की योग हा फिट राहण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. इतर अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींप्रमाणे सारालाही योगाभ्यास करायला आवडते. एकेकाळी साराचे वजन 96 किलो होते . ती अनेक ठिकाणी योगाच्या फायद्यांबद्दल बोलत आहे आणि नियमितपणे योगाचा सराव करते.
रकुल प्रीत :-
View this post on Instagram
रकुल अनेकदा तिच्या फिटनेस डायरीची माहिती इन्स्टाग्रामवर शेअर करते आणि रकुलच्या फोटो वरून कळत की अभिनेत्रीला योगा करायला किती आवडते. ती सेलिब्रिटी योगा ट्रेनर अंशुका परवानी यांच्याकडे प्रशिक्षण घेत आहे जिने करीना कपूर खान आणि अनन्या पांडे सारख्या इतर अनेक सेलिब्रिटींना प्रशिक्षण दिले आहे.
शिल्पा शेट्टी कुंद्रा :-
View this post on Instagram
शिल्पा तिच्या सौंदर्याचे योगासनाला देते. योगाची आवड असलेली शिल्पा तिची योग दिनचर्या इंस्टाग्रामवर व्हिडिओंद्वारे शेअर करत असते.
दिया मिर्झा:-
View this post on Instagram
शाश्वत जीवनासाठी दीया मिर्झा नियमितपणे योगाभ्यास करते. दिया योगा आणि ध्यानाचा सराव करून शहरातील गोंधळात शांतता शोधण्यात विश्वास ठेवते.
मीरा राजपूत कपूर :-
View this post on Instagram
निरोगी राहण्यासाठी आणि दैनंदिन जीवनात आयुर्वेदाचा अवलंब करणारी मीरा कपूरने फिटनेस साठी योगा करते. तिने, पूर्वी, योग कार्यशाळा आयोजित केल्या होत्या .
बॉलिवूड सेलिब्रिटींना योगा करायला आवडत आणि या पोस्ट्स त्याचाच पुरावा आहेत. योगामुळे आंतरिक जागरूकता विकसित होण्यास मदत होते आणि मानसिक तणाव कमी होतो. जगभरात खूप काही घडत असताना, निरोगी आणि सकारात्मक राहण्याची गरज स्पष्टपणे महत्त्वाची आहे. आणि योगामुळे ते शक्य आहे.