अभिनेत्री सारा अली खान (Sala Ali Khan) हिने बॉलिवूड मध्ये दमदार एन्ट्री करत अनेकांची मने जिंकली आहेत. तसेच साराचा नुकताच प्रदर्शित झालेला चित्रपट 'लव आज कल' (Love Aaj Kal) यामुळे ती पुन्हा चर्चेत आहे. कार्तिक आर्यन सोबतचा सारा हिचा चित्रपटाला तिच्या चाहत्यांकडून भरघोस प्रतिसाद दिला जात आहे. लव आज कल चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी साराने याचे प्रमोशन सुद्धा जोरदार केले होते. मात्र आता सारा हिला तिच्या वजनामुळे काही वेळेस काही ठिकाणी त्रास सहन करावा लागत असल्याची बाब समोर आली आहे.
प्रमोशन दरम्यान काही मीडिया ग्रुप आणि प्लॅटफॉर्मसोबत बातचीत करताना तिच्या आयुष्यातील काही गोष्टींबाबत खुलासा केला आहे. त्यावेळी तिने असे म्हटले आहे की, अमेरिकाच्या विमानतळावर मला नेहमीच अडवले जाते. कारण माझ्या पासपोर्टवर जुना फोटो म्हणजेच जेव्हा वजन 96 किलो होते त्यावेळचा आहे. पण आता वजन कमी केल्यानंतर अमेरिकाच्या विमानतळावर अधिकाऱ्यांना मला ओळखणे कठीण होते. तसेच वजन कमी केल्यामुळे मी आता एकमद फिट दिसण्यावर कोणाचा विश्वास बसत नाही असे ही तिने म्हटले आहे.('Google वालों, अब तो मेरी उम्र घटा दो', बॉलिवूड अभिनेत्री निना गुप्ता यांनी ट्विटरवर फोटो शेअर करत केली मागणी)
तसेच फोटोच नव्हे तर साराचे उपनावामुळे सुद्धा तिला मनस्ताप होतोय. कारण तिच्या स्टुटंड व्हिजावर तिचे नाव सुल्तान असून ट्रॅव्हल व्हिजावर नाव सारा अली खान आहे. त्यामुळे विमानतळावर नेहमीच तिच्या बाबत प्रश्न उभा राहतो. तर याच कारणास्तव मला अमेरिकेत येणे बंद होऊ नये याची सुद्धा चिंता तिने व्यक्त केली आहे.