'Google वालों, अब तो मेरी उम्र घटा दो', बॉलिवूड अभिनेत्री निना गुप्ता यांनी ट्विटरवर फोटो शेअर करत केली मागणी
Neena Gupta | (Photo credit: archived, edited, symbolic images)

बॉलीवुड अभिनेत्री नीना गुप्ता (Neena Gupta) नेहमीच आपल्या हटके कृतीमुळे चर्चेत असतात. खास करुन फेसबुक, ट्विटर, इंन्स्टाग्राम यांसारख्या सोशल मीडियाच्या माध्यमातून विविध फोटो शेअर केल्याने त्या आपल्या चाहते आणि प्रसारमाध्यमांमधून चर्चेत येतात. अनेकदा त्यांची प्रशंसा होते तर कधी त्यांना टीकेचे धनीही व्हावे लागते. तर कधी ट्रोलर्सकडून ट्रोलचा सामनाही करावा लागतो. आताही निना गुप्ता यांनी ट्विटरवर आपला एक नवा फोटो शेअर करुन सर्च इंजिन गूगल (Google) व्यवस्थापनाकडे लाडीक मागणी केली आहे. ट्वटरवर केलेल्या मागणीत आपल्या वाढत्या वयाला काहीसा विरोध करत निना गुप्ता म्हणतात 'Google वालों, अब तो मेरी उम्र घटा दो'.

निना गुप्ता आजकार आपल्या कामात बऱ्यात व्यग्र आहेत. त्यांच्याकडे खूप सारे चित्रपट आहेत. खास करुन लवकरच 'शुभ मंगल ज्यादा सावधान (Shubh Mangal Zyada Savdhan)' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. अभिनेत्री नीना गुप्ता ट्विटरवर आपली नवी हेयरस्टाइल फ्लॉन्ट करताना दिसतात. तसा फोटोही त्यांनी ट्विटर केला आहे. या फोटोला लिहिलेल्या कॅप्शनमध्ये त्या गुगलकडे आपल्या वाढत्या वयाबाबत नाराजी व्यक्त करताना दिसतात. तसेच, त्या आपले वय कमी करण्याबाबतही गूगलला सांगत आहेत. अर्थात हे सर्व मजेशीरपणेच.

साठ वर्षांच्या नीना गुप्ता सध्या आपला चित्रपट Shubh Mangal Zyada Savdhan प्रदर्शित होण्याची वाट पाहात आहेत. आपल्या ट्विटमध्ये त्या म्हणतात की, 'गूगल वालों अब तो मेरी उम्र कम करके लिख दो. कांता मोटवानी हेयरकट के लिए तुम्हें शुक्रिया.' दरम्यान, नुकताच त्यांचा'पंगा' चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटात त्या कंगना रनौत हिच्या आईची भूमिका साकारत आहेत. अश्विनी अय्यर तिवारी यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. मात्र, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर विशेष चालला नाही. जितकी या चित्रपटाकडून आपेक्षा ठेवण्यात आली आहे. (हेही वाचा, Academy Awards 2020: अभिनेत्री नीना गुप्ता यांच्या The Last Color चित्रपटास ऑस्कर नामांकन)

ट्विट

'शुभ मंगल ज्यादा सावधान' हा चित्रपट 2017 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'शुभ मंगल सावधान' चित्रपटाचा सीक्वेल आहे. 'शुभ मंगल सावधान' मध्ये आयुष्मान खुराना याचा दमदार अभिनय पाहायला मिळाला होता. या चित्रपटात समलैंगिक कपलची कहाणी या चित्रपटात साकारण्यात आली होती. आता याच चित्रपटाच्या सीक्वेलमधून नीना गुप्ता पुन्हा एकदा चाहत्यांच्या भेटीला येत आहेत.