Mouni Roy & Suraj Nambiar Wedding: गोव्यात मोठ्या थाटामाटात पार पडणार अभिनेत्री मौनी रॉय आणि सूरज नांबियार यांचा विवाहसोहळा; जाणून घ्या सविस्तर
Mouni Roy & Suraj Nambiar Wedding (संग्रहित संपादित प्रतिमा)

2021 मध्ये अनेक सेलिब्रिटींनी लग्न करून आपले घर वसवले. या वर्षीही अनेक सेलिब्रिटी लग्न करणार असल्याच्या बातम्या येत आहेत. या यादीत मौनी रॉयचेही (Mouni Roy) नाव समाविष्ट आहे. होय, आपल्या स्टाईलने सगळ्यांना वेड लावणारी मौनी रॉय आता लाखो लोकांची मने तोडून दुबईच्या तरुणाशी लग्नगाठ बांधणार आहे. गेल्या वर्षभरापासून मौनीच्या लग्नाच्या बातम्या येत आहेत. मौनी दुबईस्थित बॉयफ्रेंड सूरज नांबियारला (Suraj Nambiar) डेट करत आहे. यापूर्वी बातम्या येत होत्या की मौनी दुबईत लग्न करणार आहे. पण आता लग्नाबाबत एक नवीन अपडेट समोर आले आहे.

हिंदुस्तान टाइम्सच्या रिपोर्टनुसार, मौनी 27 जानेवारीला गोव्यात लग्न करणार आहे. वेबसाइटनुसार, लग्नाच्या ठिकाणासाठी पंचतारांकित रिसॉर्ट बुक करण्यात आले आहे. पाहुण्यांना लग्नाची आमंत्रणे पाठवली आहेत. याशिवाय, सर्व पाहुण्यांना लसीकरण प्रमाणपत्र सोबत आणण्यास सांगितले आहे. लग्नानंतर 28 जानेवारीला एका खास डान्स पार्टीचे आयोजन केले आहे.

ज्या सेलिब्रिटींना लग्नाची आमंत्रणे मिळाली आहेत त्यात करण जोहर, एकता कपूर, मनीष मल्होत्रा, आश्का गोराडिया यांचा समावेश आहे. याआधी मौनीने गोव्यात बॅचलर पार्टी केली होती ज्यामध्ये तिने तिच्या गर्ल गँगसोबत खूप मस्ती केली होती. मौनीचा होणारा नवरा सूरज नांबियार दुबईचा असून, तो बँकर आणि व्यापारी आहे. सुरज मुळचा बंगळुरूचा आहे. (हेही वाचा: लग्नाच्या एका महिन्यानंतर Katrina Kaif हिने पती Vicky Kaushal सोबतचा 'हा' फोटो शेअर करत दिले क्युट कॅप्शन)

मौनीच्या प्रोफेशनल लाईफबद्दल बोलायचे तर, तिने तिच्या करिअरची सुरुवात ‘क्यूंकी सास भी कभी बहू थी’ या मालिकेमधून केली. यानंतर तिने कस्तुरी, दो सहेलिया, देवों के देव महादेव, नागिन, नागिन 2 मध्ये काम केले. यानंतर मौनी चित्रपटांकडे वळली आणि 2004 मध्ये रन चित्रपटात एक खास गाणे दिले. त्यानंतर मौनीने एका पंजाबी चित्रपटात काम केले. यानंतर मौनीने अक्षय कुमारच्या गोल्ड चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. आता मौनी ब्रह्मास्त्र या चित्रपटात दिसणार आहे.