Devoleena Bhattacharjee's Friend Shot Dead: अभिनेत्री देवोलेना भटाचार्य हिच्या मित्राची गोळी घालून हत्या, PM नरेंद्र मोदींकडे मागितली मदत
Devoleena Bhattacharjee PC INTSA

Devoleena Bhattacharjee's Friend Shot Dead:  अभिनेत्री देवोलेना उर्फ गोपी बहु हिच्या मित्राची अमेरिकेत गोळी घालून हत्या केल्याची माहिती समोर येत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनेत्री ही माहिती दिली आहे. मंगळवारी संध्यकाळी वॉक करत असताना गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. अमेरिकेतील सेंट लुईस अकादमी परिसरात घडली आहे.त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून तीने मदत मागितली आहे.  (हेही वाचा-ढाका येथील सात मजली इमारतीला आग,

शुक्रवारी तिने ट्वीटवर एक पोस्ट लिहली आहे ज्यात लिहलं आहे की, माझा मित्र अमरनाथ घोष यांची मंगळवारी हत्या करण्यात आली.  तो कुटुंबातील एकुलता एक सदस्य होता. 3 वर्षापूर्वी आईचे निधन झाले होते आणि  लहानपणीच वडिलांचे निधन झाले होते. संध्याकाळी सेंट लुईस अकडमी परिसरत अचानक काही जणांनी त्याच्या गोळीबार केला आणि त्याचा मृत्यू झाला. मित्रांशिवाय कुटुंबात कोणीच नाही. ते कोलकत्याचे होते. ते एक उत्कृष्ट नृत्यांगण होते. PHD करत होते.

त्याच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप समोर आले नाही. अद्याप या संदर्भात कोणतीही माहिती समोर आली नाही. त्यानंतर तीनं पुढे लिहलं आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डॉक्टर जय शंकर यांच्या कडून मदतीसाठी अपील केले आहे. त्याची हत्या का केली याचे कारण शोधा अशी विनंती केली आहे.