Sahil Khan (PC - Instagram)

Mahadev Betting App Case: महादेव बेटिंग ॲप प्रकरणातील (Mahadev Betting App Case) आरोपी अभिनेता साहिल खान (Actor Sahil Khan) ला 7 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. महादेव बेटिंग ॲप प्रकरणी मुंबई गुन्हे शाखेच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) ताब्यात घेतल्यानंतर अभिनेता साहिल खानला 28 एप्रिल रोजी छत्तीसगडहून मुंबईत आणण्यात आले होते. (Mahadev Betting App: महादेव बेटिंग अ‍ॅपच्या मालकाला दुबईत बेड्या)

अटक टाळण्यासाठी साहिल खान सतत आपले ठिकाण बदलून मुंबईतून पळून गेला होता. या अभिनेत्यावर बेटिंग साइट चालवण्याचा आणि बेकायदेशीर सट्टेबाजीला प्रोत्साहन देण्याचा आरोप करण्यात आला आहे. मुंबईतील माटुंगा पोलिसांनी महादेव बेटिंग ॲप प्रकरणाच्या तपासात त्याचे नाव समोर आले होते. (हेही वाचा - Mahadev Betting App Case: अभिनेता साहिल खान फरार; महादेव बेटिंग ॲप प्रकरणी अभिनेत्यावर करण्यात आले होते गंभीर आरोप)

फिटनेस तज्ञ म्हणून काम करणारा साहिल खान 24 एप्रिल रोजी शहरातून पळून गेला होता. तो सतत त्याचे ठिकाण बदलून पोलिसांना चकमा देत होता. 24 एप्रिल रोजी मुंबई उच्च न्यायालयाने त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर पोलीस त्याला पकडण्यासाठी प्रयत्न करत होते. त्याचा ठावठिकाणा शोधण्यासाठी, पोलीस त्याच्या स्थानाचा मागोवा घेत होते ज्यामुळे तो सतत वेगवेगळ्या ठिकाणी फिरत होता. (हेही वाचा -Mahadev Betting App: छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री अडचणीत! महादेव बेटिंग ॲप प्रकरणी FIR दाखल)

एका वरिष्ठ गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्याने सांगितले की, खान एका बेटिंग ॲप फर्ममध्ये भागीदार होता. तो सोशल मीडियाद्वारे ॲपचा प्रचार करत होता. त्याला मनी ट्रेलबद्दल स्पष्टीकरण देण्यास सांगितले होते. त्याने तपासात सहकार्य केले नाही, असे अधिकाऱ्याने सांगितले.