लोकसभा निवडणुकीपूर्वी (Loksabha Election 2024) छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल (Bhupesh Baghel) यांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. महादेव बेटिंग ॲप (Mahadev Betting App Case) प्रकरणात त्यांच्याविरोधात एफआयआर (FIR) दाखल करण्यात आला आहे. पोलीसांनी फसवणूक, गुन्हेगारी कट, विश्वासघात अशा वेगवेगळ्या प्रकरणांशी संबंधीत कलमांतर्गत आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम 7 आणि 11 अंतर्गत एफआयआर दाखल केला आहे. बघेल यांच्या सोबतच एफआयआरमध्ये महादेव बेटिंग ॲपचा प्रमोटर सौरभ चंद्राकर आणि रवि उप्पल यांच्यासह 17 इतर लोकांची नावे देखील आहेत. (हेही वाचा - Mahadev Betting App: महादेव बेटिंग अॅपच्या मालकाला दुबईत बेड्या)
या प्रकरणात ईडीने दावा केला होता की त्यांनी एक कॅश कुरियरचे इमेल स्टेटमेंट ट्रॅक केलं आहे. ज्यामध्ये भूपेश बघेल यांनी यूएई येथील या ॲपच्या प्रमोटर्सकडून कथितरित्या 508 कोटी रुपये घेतले होते. तसेच महादेव बुकचा मालक सध्या अटकेत असून मनी लाँड्रिंगच्या प्रकरणात त्याला अटक करण्यात आली आहे. महादेव बेटिंग ॲप हे ऑनलाइन सट्टेबाजीसाठी डिझाइन केलेले ॲप आहे. यावर यूजर्स पोकर, कार्ड गेम्स, चान्स गेम्स नावाचे लाईव्ह गेम्स खेळायेचे.
महादेव ऑनलाईन बेटिंग ॲप प्रकरण हे मागील बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. या प्रकरणात ईडीने दावा केला होता की त्यांनी एक कॅश कुरियरचे इमेल स्टेटमेंट ट्रॅक केलं आहे. या ॲपच्या माध्यमातून क्रिकेट, बॅडमिंटन, टेनिस, फुटबॉल सारख्या खेळांवर यासोबतच निवडणुकांवर अवैध सट्टा लावला जायचा. याचे सर्वाधिक खाते छत्तीसगडमध्ये उघडण्यात आले होते.