ज्याला लोक देव मानून त्याच्या फोटोलो दुधाची आंघोळ घालणा-या, त्यांच्यासाठी उपास-तापास करणा-या तामिळचे सुपरस्टार रजनीकांत यांनी ट्विटच्या माध्यमातून चाह (Superstar Rajinikanth) त्यांसह सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. आपण आपला नवा पक्ष सुरु करणार असून येत्या 31 डिसेंबरला आपल्या राजकीय पक्षाची अधिकृत घोषणा करणार असल्याची माहिती रजनीकांत यांनी ट्विटच्या (Tweet) माध्यमातून दिली आहे. तसच त्यांचा हा पक्ष नवीन वर्षात जानेवारी महिन्यापासून कार्यरत होईल असंही त्यांनी सांगितले आहे. हा त्यांच्या चाहत्यांसह संपूर्ण राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनला असून सर्व या घोषणेची आतुरतेने वाट पाहात आहे.
तामिळ सुपरस्टार रजनीकांत यांचा मोठा चाहतावर्ग आहे. त्यांच्यासाठी काहीही करण्याची त्यांच्या चाहत्यांची तयारी असते. असा प्रचंड मोठा चाहतावर्ग असलेला व्यक्ती जेव्हा स्वत:चा राजकीय पक्ष सुरु करणार अशी घोषणा करताच राजकारणाचे चित्र पालटणार यात दुमत नाही.हेदेखील वाचा- Urmila Matondkar Joins Shiv Sena: अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांंचा 'मातोश्री' वर शिवसेना पक्षामध्ये प्रवेश
A political party will be launched in January; Announcement regarding it will be made on December 31st, tweets actor Rajinikanth pic.twitter.com/K2MikOk30I
— ANI (@ANI) December 3, 2020
दरम्यान रजनीकांत यांच्या समर्थकांनी नेहमीच त्यांना राजकारणापासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. तर काहींनी त्यांचे तामिळनाडूत पोस्टर्स लावून त्यांना राजकारणापासून लांब राहण्याच्या निर्णयावर पुर्नविचार करण्यास सांगितले होते. दरम्यान याबाबत विचारविनियमय करत रजनीकांत यांनी स्वत:चा पक्ष सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर पुढील वर्षी म्हणजेच 2021 मध्ये तामिळनाडूत विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. अशा वेळी रजनीकांत यांचा पक्ष तामिळनाडूतील राजकारणाचे चित्र पालटू शकतो अशी शंका व्यक्त केली जात आहे.
रजनीकांत गेल्या दोन वर्षांपासून राजकारणात सक्रीय आहेत. मात्र अधिकृतपणे त्यांनी राजकारणात प्रवेश केलेला नाही. दरम्यान कोरोना व्हायरसच्या काळात त्यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांचा पक्ष स्थापन करण्याचा निर्णय लांबणीवर पडला होता. मात्र आता ते लवकरच आपला पक्ष स्थापन करणार असल्याने सर्वांचे या घोषणेकडे लक्ष लागले आहे. एकूणच लवकरच तामिळनाडूतील राजकारणात बदलाचे वारे वाहणार असे चित्र निर्माण झाले आहे.