Naseeruddin Shah Health Update: नसीरुद्दीन शाह यांच्या फुफ्फुसात सौम्य स्वरूपात pneumonia पॅच; लवकरच हॉस्पिटल मधून सुट्टी मिळेल,  पत्नी Ratna Pathak यांची माहिती
Nasiruddhin Shah | File Photo

अभिनेते नसीरुद्दीन शाह (Naseeruddin Shah) यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. 70 वर्षीय नसीरुद्दीन शाह यांच्या प्रकृती अस्वास्थ्याबद्दल यापूर्वी अनेकदा चर्चा झाल्या होत्या पण त्यावेळी त्या धुडकावण्यात आल्या होत्या पण सध्या मागील 2 वर्षांपासून नसीरुद्दीन शाह यांच्यावर मुंबईतील खार येथील हिंदुजा रूग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. ANI Tweet च्या वृत्तानुसार, नसरुद्दीन यांच्या पत्नी रतन पाठक शाह यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे नसुरूद्दीन यांना येत्या काही दिवसात हॉस्पिटल मधून सुट्टी मिळू शकते. दरम्यान त्यांच्या फुफ्फुसामध्ये न्युमोनिया चे काही पॅच आढळले आहेत.

बॉम्बे टाईम्सला देखील नसीरुद्दीन शाह यांच्या मॅनेजर ने दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू असून ते डॉक्टरांच्या निगराणी खाली आहेत. त्यांच्याकडून उपचारांना प्रतिसाद चांगल्याप्रकारे मिळत आहे. त्यांच्या फुफ्फुसात निमोनियाचा पॅच असल्याचं आढळताच त्यांना तातडीने हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आल्याचेही त्याने म्हटलं आहे. (नक्की वाचा: Dilip Kumar Hospitalized: जेष्ठ अभिनेते दिलीप कुमार पुन्हा रुग्णालयात दाखल).

ANI Tweet

नसीरुद्दीन शाह हे विवेक अग्निहोत्रीच्या द ताश्कंद फाईल्स आणि सीमा पहावाच्या रामप्रसाद की तेहरवी मध्ये शेवटचे पहायला मिळाले आहेत. सोबतच झी 5 च्या Mee Raqsam मध्येही त्यांनी काम केले आहे. दरम्यान अमेझॉन प्राईमच्या Bandish Bandits मधील त्यांच्या कामाला रसिक आणि क्रिटिक्स या दोघांकडूनही मोठी वाहवा मिळाली होती.

नसीरुद्दीन शाह हे 3 वेळेस नॅशनल अवॉर्ड विजेते अभिनेते आहेत. त्यांच्या भारतीय सिनेसृष्टीतील योअगदानाबद्दल त्यांना ' पद्मश्री' आणि पद्मभूषण' हे दोन मानाचे पुरस्कार देखील मिळाले आहेत.