एक उत्कृष्ट मॉडेल आणि लोकप्रिय अभिनेता मिलिंद सोमण (Milind Soman) याला काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. यावर यशस्वीरित्या मात करून अभिनेता ठणठणीत बरा झाला आहे. उत्कृष्ट फिटनेस ट्रेनर असलेला मिलिंद सोमण पुन्हा एकदा जोमाने आपल्या वर्कआऊटला सुरुवात केली असून त्यासंदर्भातील एक व्हिडिओ त्याने शेअर केला आहे. या व्हिडिओखाली 'मी ठणठणीत बरा झालो असून लवकरच मी माझा प्लाझ्मा (Plasma) दान करण्याचा निर्णय घेतला आहे.' हा व्हिडिओ सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
हा व्हिडीओ शेअर करताना अभिनेते मिलिंद सोमण यांनी लिहिलंय, "आता मी पुर्णपणे बरा झालोय आणि मी पुढच्या 10 दिवसांत प्लाझ्मा दान करणारेय…जेणेकरून अनेक करोना रूग्णांना करोनाशी सामना करण्यासाठी आणि त्यांचे जीव वाचवण्यासाठी उपयुक्त ठरतील…शांत रहा आणि काळजी घ्या…आणि जे जे शक्य आहे ते नक्की करा…!"हेदेखील वाचा- Anushka Sharma ने व्हिडिओ शेअर करुन सांगितले वाढदिवस साजरा न करण्याचे कारण, सोबतच केली महत्त्वाची घोषणा
View this post on Instagram
अभिनेते मिलिंद सोमण यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओमध्ये ते दोन्ही हातात मुग्दर पकडून व्यायाम करताना दिसून येतायत.
अभिनेते मिलिंद सोमण यांची कोव्हिड टेस्ट निगेटीव्ह आल्यानंतर त्यांनी हा व्यायामाचा व्हिडीओ शेअर केलाय. मिलिंद सोमण याला 26 मार्चला कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने त्याने कोरोनावर यशस्वीरित्या मात केली. आतापर्यंत अनेक कलाकारांसह, गायक, दिग्दर्शकांना कोरोनाची लागण झाली आहे. काही दिवसांपूर्वी परफेक्शनिस्ट आमिर खान याला कोरोनाची लागण झाल्याचे कळले. त्यापाठोपाठ आर माधवन याला देखील कोरोनाने घेरले आहे.