Boycott Mirzapur 2: लोकप्रिय शो 'मिर्जापूर' (Mirzapur) चा दुसरा सीझन सुरू होण्यापूर्वी सोशल मीडियावर काही नेटीझन्सने यावर बहिष्कार घालण्याची मागणी केली आहे. काही दिवसांपूर्वीच या सीरिजचा ट्रेलर रिलीज करण्यात आला होता. तेव्हापासून ट्विटरवर हॅशटॅगबॉयकाटमीजारापूर 2 (Boycott Mirzapur 2) ट्रेंड होत आहे. यावर अभिनेता दिव्येंदु शर्मा (Divyenndu Sharma) आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हणाला आहे की, 'या शोमध्ये सहभागी कलाकार, टीम आणि त्याच्या चाहत्यांनी अशा ट्रेंडबद्दल विचार करू नये.'
दिवेन्दुने आयएएनएसला यासंदर्भात सांगितले की, "मला याची फारशी पर्वा नाही. त्यांना स्वत: किती त्रास आहे, हे त्यांना माहित नाही. कारण, 'मिर्झापूर'चे अनेक चाहते आहेत. त्यांनी हे मूर्ख कृत्य थांबवायला हवं. अशा हॅशटॅगचा वापर करणे मूर्खपणाचे लक्षण आहे. आपल्या सर्वांना माहित आहे की, मिर्झापूर शो लोकांना किती आवडतो. पैसे देऊन तयार करण्यात आलेला हा ट्रेंड निराधार आहे." (हेही वाचा -अभिनेता आमिर खानची लेक Ira Khan 4 वर्षांपासून करतेय Clinical Depression चा सामना; पहा पोस्ट)
Pls boycott and rate it on IMDb as well.@PrimeVideoIN#BoycottMirzapur2 pic.twitter.com/umazD0l0iW
— vartamaan (@shekharDev23) October 6, 2020
दिवेन्दु पुढे म्हणाला आहे की, 'मला त्यांच्याबद्दल वाईट वाटते. बाहेर जाऊन बोलू नकोस, नाहीतर लोकांसमोर तूला खूप मार मिळेल. या शोमध्ये दिव्येंदु मुन्ना त्रिपाठीची भूमिका साकारत आहे. 6 ऑक्टोबर रोजी 'मिर्झापूर 2' चा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला होता. या ट्रेलरला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला होता.