आमिर खान आणि मुलगी इरा (फोटो सौजन्य- Instagram)

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळख असलेला अभिनेता आमिर खानची (Aamir Khan)  लेक इरा (Ira Khan) हीने ती 4 वर्ष क्लिनिकल डिप्रेशनमध्ये (Clinical Depression) असल्याची माहिती दिली आहे. काल, ऑक्टोबर 10, 2020 या जागतिक मानसिक दिनाच्या (World Mental Health Day 2020) दिवशी तिने इंस्टाग्राम वर एक व्हिडिओ शेअर करत याबाबत माहिती दिली आहे. इरा खान ही अभिनेता आमिर खान आणि त्याची पहिली पत्नी रिना खान हीची मुलगी आहे. सध्या मानसिक आरोग्य जपण्यासाठी विविध स्तरांवर जनजागृतीची कामं सुरू आहेत. अशामध्ये इराने देखील तिच्या मानसिक आरोग्याबद्दल, डिप्रेशनबद्दल माहिती देताना तिच्या चाहत्यांना मानसिक स्वास्थ्याचं महत्त्व पटवून दिले आहे.

इराने ती 4 वर्षांपासून क्लिनिकल डिप्रेशनचा सामना करत असल्याचं व्हिडिओ मध्ये म्हटलं आहे. यामध्ये तिने आता ती ठीक आहे. 'मानसिक आरोग्याबद्दल मला काही तरी काम करायचं आहे. ते नेमकं काय असेल? याची माहिती नाही पण मी माझ्यापासून सुरूवात करण्याचा. माझा प्रवास शेअर करणार आहे. यामधून आपण काही गोष्टी समजून घेऊ शकतो.' असे इरा म्हणते. तिने नैराश्याबद्दल पहिल्यांदाच खुलासा केला असून तिने इंस्टाग्रामवर हा व्हिडीओ शेअर केला आहे.World Mental Health Day 2020: कोविड 19 या जागतिक आरोग्य संकटाचा सामना करत असताना स्वतः सह कुटुंबाच्या मानसिक आरोग्याची काळजी घेण्यासाठी खास टीप्स!

इरा खानचा व्हिडीओ

सतत निराश आणि असहाय वाटणं ही प्रामुख्याने नैराश्याची लक्षणं आहेत. major depression हे क्लिनिकल डिप्रेशन म्हणून देखील ओळखलं जातं. यामध्ये काम, अभ्यास कशातच लक्ष केंद्रीत न होणं, झोप, जेवणावरून इच्छा उडणं अशा समस्या असतात. तर क्लिनिकल डिप्रेशन हा काही जणांमध्ये आयुष्यभर तर काहींमध्ये विशिष्ट काळ असू शकतो.

महिलांमध्ये हर्मोनल चेंजेंस, गरोदरपणाचा काळ, मिसकॅरेज, मेनोपॉज, मासिकपाळी मध्ये येऊ शकतो. तसेच सतत तणाव, काम, करियर आणि संसार यांची कसरत सांभाळता सांभाळता होणारी दमछाक यामुळे बळावण्याचा धोका देखील सांगितला जातो.