Clinical Depression च्या पोस्टवरुन ट्रोल करणाऱ्यांना Aamir Khan ची मुलगी Ira Khan चा इशारा; उचलणार 'हे' पाऊल
Ira Khan (Photo Credits: Instagram)

बॉलिवूड अभिनेता आमिर खान (Aamir khan) याची मुलगी इरा खान (Ira Khan) सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय असते. आपल्या आयुष्यातील अपडेट्स ती सोशल मीडिया पोस्टद्वारे शेअर करत असते. तिच्या अनेक पोस्टला चाहत्यांकडून पसंती मिळते. परंतु, काही वेळेस तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. अशा सर्वांना इराने इशारा दिला आहे. अलिकडेच इराला एका पोस्टवरुन ट्रोल करण्यात आले. त्यानंतर इराने ट्रोलर्संना तुमचे कमेंट्स डिलीट करण्यात येतील आणि पुन्हा केल्यास ब्लॉक करण्यात येईल, असे म्हटले आहे.

आपल्या इंस्टास्टोरीत इराने लिहिले की, "मानसिक स्वास्थ संबंधित पोस्टवर द्वेषपूर्ण आणि विसंगत प्रतिक्रीया देणाऱ्या कमेंटेस डिलीट करेन आणि पुन्हा कमेंट्स केल्यास ब्लॉक करेन." (अभिनेता आमिर खानची लेक Ira Khan 4 वर्षांपासून करतेय Clinical Depression चा सामना; पहा पोस्ट)

पहा पोस्ट:

Ira Khan Insta Story (Photo Credits: Instagram)

अलिकडेच इराने सोशल मीडियावर मानसिक स्वास्थाबद्दल लोकांना जागरुक करण्यासाठी एक पोस्ट केली होती. तिच्या त्या पोस्टवर सुरुवातीला चांगल्या कमेंट्स आल्या आणि त्यानंतर मात्र ट्रोल करण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यानंतर इराने हे ठोस पाऊल उचलले आहे.

पहा व्हिडिओ:

इरा खान गेल्या 4 वर्षांपासून क्लिनिकल डिप्रेशनमध्ये आहे. याची माहिती इराने 10 ऑक्टोबर रोजी जागतिक मानसिक दिनाच्या दिवशी एक व्हिडिओ शेअर करत दिली होती. मात्र त्यानंतर तिला ट्रोल करण्याचा प्रयत्न होऊ लागल्याने इराने ट्रोलर्संना तंबी भरली आहे.