Disha Patani-Aleksandar Alex Ilic Photo: बी-टाऊनची प्रसिद्ध अभिनेत्री दिशा पाटनी (Disha Patani) नेहमीचं चर्चेत असते. सध्या चित्रपटांऐवजी दिशा पाटनीचे नाव तिच्या वैयक्तिक आयुष्यासाठी सतत चर्चेत असते. बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफसोबत ब्रेकअप झाल्यानंतर दिशा पाटनीचे नाव तिचा कथित बॉयफ्रेंड अलेक्झांडर अॅलेक्स अलिक (Aleksandar Alex Ilic) सोबत जोडले जात आहे. दरम्यान, दिशा आणि अलेक्झांडरचा एक फोटो समोर आला आहे. यावर टायगर श्रॉफची बहीण कृष्णा श्रॉफ हिने प्रतिक्रिया दिली आहे.
अलेक्झांडर अॅलेक्स अलिक त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडल अभिनेत्री दिशा पटनीसोबत फोटो शेअर करत असल्याचे अनेकदा पाहायला मिळते. गुरुवारी देखील अलेक्झांडर अॅलेक्स अलिकने दिशा पटनीसोबतचे काही लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत. दिशा आणि अलेक्झांडरची जवळीक या फोटोंमधून सहज लक्षात येते. तसेच, हे फोटो पाहून, अलेक्झांडर अॅलेक्स अलिक आणि दिशा पटनी प्रत्यक्षात एकमेकांना डेट करत असल्याचा दावा आणखी मजबूत होताना दिसत आहे. (हेही वाचा - उर्वशी रौतेलाची आई मीरा रौतेलाने Rishabh Pant ला लवकर बरे होण्यासाठी दिल्या शुभेच्छा, 'आपके प्यारे दामद जी' म्हणत नेटिझन्स केले ट्रोल)
या सर्व प्रकारावर टायगर श्रॉफची बहीण कृष्णा श्रॉफने अलेक्झांडर अॅलेक्स अलिकच्या या फोटोंवर दिलेली प्रतिक्रिया आश्चर्यचकित करणारी आहे. वास्तविक, कृष्णा श्रॉफने या फोटोंवर कमेंट करत लिहिले आहे की, या फोटोनंतर ते काय लिहितील हे वाचण्यासाठी प्रतीक्षा करू शकत नाही. म्हणजे कृष्णा इथे नेटिझन्सबद्दल बोलताना दिसत आहे.
View this post on Instagram
View this post on Instagram
अर्थात दिशा पटनीचे टायगर श्रॉफसोबत ब्रेकअप झाले असले तरी दिशाचे तिच्या कुटुंबासोबतचे बाँडिंग खूपच चांगले आहे. विशेषत: दिशा पाटनी आणि तिचा अफवा असलेला बॉयफ्रेंड अलेक्झांडर अॅलेक्स अलिक यांची टायगरची बहीण कृष्णा श्रॉफसोबतची मैत्री खूप घट्ट आहे. अनेक प्रसंगी हे तिघेही सोशल मीडियावर एकत्र फोटो शेअर करताना दिसले आहेत.