Movies And Shows Releasing Today: आज प्रर्दर्शित होणार चित्रपटगृहापासुन ते ओटीटीपर्यंत एकापेक्षा एक चित्रपटांची मेजवानी, पाह ही यादी
(Photo Credit - Twitter)

आज म्हणजेच 19 नोव्हेंबरला अनेक चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. थिएटरपासून ते ओटीटीपर्यंत एकापेक्षा एक चित्रपटाची मेजवानी प्रेक्षकांना मिळणार आहे. चित्रपट मनोरंज गोष्ट अशी आहे की यिथे सर्व भिन्न शैलींचे चित्रपट आणि शो आहेत. त्यामुळे या वीकेंडला तुमचे मनोरंजन करण्यासाठी अनेक चित्रपट आणि शो आहेत. त्यामुळे सगळे प्रेक्षक या सर्वांचा आनंद घेऊ शकता. या यादीमध्ये मराठी चित्रपट झिम्मा आहे जो चित्रपटगृहात प्रर्दर्शित होणार आहे. तसेच सैफ अली खान आणि राणी मुखर्जीचा चित्रपट बंटी और बबली 2 चित्रपटगृहामध्ये प्रर्दर्शित होणार आहे. आणि कार्तिक आर्यनच्या मुख्य भुमिका असणारा धमाका चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होत आहे. (हे ही वाचा सिद्धार्थ मल्होत्रा ​​दिसणार 'योध्दा'मध्ये फुल टू अ‍ॅक्शनमध्ये, पाहा कधी होणार प्रर्दशित.)

आज रिलीज होणाऱ्या चित्रपट आणि शोची यादी -

झिम्मा (चित्रपटगृह)

हेमंत ढोमे दिग्दर्शित 'झिम्मा' चित्रपट आज चित्रपटगृहात प्रर्दर्शित होत आहे. 'चूल आणि मूल' या संकल्पनेखाली वावरणाऱ्या स्त्रिया जेव्हा मोकळ्या आकाशाखाली स्वछंदी आयुष्य जगतात, तेव्हा त्यांची स्वतःशीच एक नवीन ओळख होते, त्यामुळे प्रत्येक महिलेने पाहावा, असा हा चित्रपट आहे.

बंटी और बबली 2  (चित्रपटगृह)

सैफ अली खान, राणी मुखर्जी, सिद्धांत चुवैदी आणि शर्वरी वाघ यांचा मुख्य भुमिका असलेला चित्रपट बंटी और बबली 2 आज रिलीज होत आहे. सैफ आणि राणीची जोडी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. याआधीही या दोघांच्या जोडीने अनेक रोमँटिक चित्रपट एकत्र दिले आहेत. यासोबतच सिद्धांत आणि शर्वरीसारखी फ्रेश जोडी  काम करत आहे.

ये मर्द गरीब  (चित्रपटगृह)

अनुप थापा दिग्दर्शित या चित्रपटात विराज राव, मनुकृती पाहवा आणि सीमा भार्गव यांच्या प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटात पुरुषांबद्दलची स्टिरियोटाइप दाखवली आहे तसेच पुरुषांबद्दल समजावून सांगण्यासाठी एक ताजेतवाने विषय या चित्रपटात घेतला आहे.

धमाका  (Netflix)

कार्तिक आर्यनचा अॅक्शन थ्रिलर चित्रपट धमाका हा आजचा मोठा OTT रिलीज झालेला चित्रपट आहे. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर १९ नोव्हेंबर २०२१ रोजी दुपारी १.३० वाजता प्रसारित होईल. हा चित्रपट इंग्रजी सबटायटल्ससह हिंदी ऑडिओमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटामध्ये कार्तिक आर्यनची सर्वात वेगळी स्टाइल पाहायला मिळणार आहे. बरेच दिवस चाहते या चित्रपटाची वाट पाहत होते.

कैश (Hotstar)

भारतीय कॉमेडी चित्रपट कॅश देखील आज प्रदर्शित होत आहे. अमोल पराशर आणि स्मृती कालरा आणि गुलशन ग्रोव्हर अभिनीत हा विनोदी चित्रपट Hotstar प्रदर्शित होत आहे. हा चित्रपट ऋषभ सेठने दिग्दर्शित केला आहे म्हणजेच १९ नोव्हेंबरला अनेक चित्रपट प्रदर्शित होणार आहेत.

द व्हील ऑफ टाइम (Amazon Prime Video)

धमाका सारखा मोठा चित्रपट आज नेटफ्लिक्स प्रदर्शित होत आहे. त्याच वेळी, Amazon Prime चा मोठा चित्रपट The Wheel of Time देखील आज रिलीज होत आहे. हा चित्रपट रॉबर्ट जॉर्डन यांच्या पुस्तकावर आधारित आहे. या चित्रपटात गॉन गर्ल फेम रोसामुंड पाईक मुख्य भूमिकेत आहे.

योर ऑनर (Sony Live)

सोनी लिव्हच्या मूळ वेब सिरीज युवर ऑनरचा दुसरा सीझन देखील आज प्रर्दर्शित होणार आहे. आज या शोचे पहिले 5 एपिसोड्स आणि बाकीचे 26 नोव्हेंबरला रिलीज होतील. या शोमध्ये जिमी शेरगिल, माही गिल, गुलसन ग्रोवर, पुलकित माकोल, झीशान यांच्यासह अनेक कलाकार महत्त्वाच्या भूमिका साकारत आहेत. जे सगळे नवीन पदार्पण करत आहेत.