Jayeshbhai Jordar: नाम है जयश भाई और काम है जोरदार; रणवीर सिंहचा नवीन चित्रपट 'या' दिवशी होणार प्रदर्शित
JayeshBhai Jordar (Photo Credit - Insta)

गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या 83 या चित्रपटात रणवीर सिंह (Ranveer Singh) शेवटचा दिसला होता. या चित्रपटात रणवीरने कपिल देव (Kapil Dev) यांची भूमिका साकारली असून त्यांच्या कामाचे खूप कौतुक करण्यात आले. आता रणवीर पुन्हा एकदा त्याच्या अतरंगी अवतारात दिसणार आहे. खरं तर, आता रणवीर 'जयेश भाई जोरदार' (Jayeshbhai Jordar) या नवीन चित्रपटात दिसणार आहे, ज्याचा एक छोटा व्हिडिओ रणवीरने सोशल मीडियावर (Social Media) शेअर केला आहे आणि त्याद्वारे त्याच्या भूमिकेची ओळख करून दिली आहे. यासोबतच रणवीरने चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर केली आहे. हा व्हिडिओ खूपच वेगळा आहे आणि तो पाहिल्यानंतर चाहत्यांमध्ये या चित्रपटाची उत्सुकता वाढली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ranveer Singh (@ranveersingh)

 

13 मे रोजी होणार मोठ्या पडद्यावर प्रदर्शित

रणवीरचा हा चित्रपट यावर्षी 13 मे रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात रणवीरसोबत शालिनी पांडे, बोमन इराणी आणि रत्ना पाठक शाह यांच्याही भूमिका आहेत. दिव्यांग ठक्कर या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. (हे ही वाचा Dhanush Reaction To Jhund: "झुंड" चित्रपटावर धनुषची प्रतिक्रिया, म्हणाल- हा संदेश सर्वानी ऐकायला पाहिजे)

याआधी हा चित्रपट यावर्षी फेब्रुवारीमध्ये प्रदर्शित होणार होता, परंतु नंतर कोविडच्या वाढत्या प्रकरणामुळे चित्रपटगृहे बंद पडू लागली आणि चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले. या चित्रपटाशिवाय रणवीर सर्कस आणि रॉकी आणि राणी की प्रेम काहाणी या चित्रपटात दिसणार आहे. सर्कसमध्ये रणवीरसोबत जॅकलिन फर्नांडिस आणि पूजा हेगडे मुख्य भूमिकेत आहेत. दुसरीकडे, रॉकी आणि राणीच्या लव्हस्टोरीमध्ये रणवीर आणि आलिया भट्टची जोडी पुन्हा एकत्र दिसणार आहे. याआधी दोघेही गली बॉय या चित्रपटात दिसले होते, जो खूप गाजला होता.