Bihar: बिहारमध्ये गुन्हेगारांचा धुमाकूळ; सुशांत सिंह राजपूतच्या भावाला भर चौकात घातल्या गोळ्या
फोटो सौजन्य - Pixaboy

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतने (Sushant Singh Rajput) याने गेल्या काही दिवसांपूर्वी आपल्या राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली होती. यामुळे संपूर्ण देश हळहळला होता. आता सुशांत सिंह राजपूतच्या कुटुंबीयांबाबत एक दुःखद बातमी समोर आली आहे. बिहारच्या (Bihar) सहरसा (Saharsa) येथे सुशांत सिंहचा भावस भावासह त्याच्या सहकाऱ्यांवर अज्ञातांनी गोळीबार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या गोळीबारात दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे.

राजकुमार सिंह असे सुशांतच्या मावस भावाचे नाव आहे. राजकुमार हा यामाहा मोटारसायकलचा शोरूमचा मालक आहे. त्याचे बिहारमधील सहरसा, सुपौल आणि मधेपूर या तीन जिल्ह्यात यामाहा मोटारसायकलचे शोरूम आहे. मात्र, राजकुमार हे रोजप्रमाणे आजही मधेपूरा येथे शोरूम उघडण्यासाठी गेले असताना अज्ञात लोकांनी त्यांच्यावर गोळीबार केला. ही घटना बैजनाथपूर चौकात ढिवसाढवळ्या गोळीबार केला. या गोळीबारात राजकुमार यांच्यासह त्यांचे सहकारी अली हसन हे दोघेही गंभीर जखमी झाले. त्यानंतर जखमी अवस्थेत दोघांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या दोघांवर उपचार सुरु असून अली हसन यांची प्रकृती चिंताजनक आहे. हे देखील वाचा- Dhanashri Kadgaonkar Baby: अभिनेत्री धनश्री कडगांवकर ने दिला मुलाला जन्म; सोशल मीडियात खास पोस्ट द्वारा शेअर केली गूड न्यूज!

या घटनेची माहिती होताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या हल्ल्यामागचे कारण अद्याप समजू शकलेले नसून याप्रकरणी पोलीस अधिक चौकशी करत आहेत. दरम्यान, पोलीस पोलीस विविध पुरावे शोधण्याचा काम करत आहेत. याशिवाय, घटनास्थळी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचाही शोध घेतला जात आहे.