बिग बॉस मराठी 2 (Bigg Boss Marathi 2) मधील स्पर्धक माधव देवचके (Madhav Deochake) शो च्या उत्तरार्धातच घरातून बाहेर पडला, यामुळे जरी त्याला बिग बॉसच्या ट्रॉफीपासून दूर राहावे लागले असले तरी, तो बाहेरच्या जगात खऱ्या अर्थाने विजेता ठरला आहे.... वाचून तुम्हीही चक्रावलात ना.. पण थांबा तुम्ही पुढे विचार करण्याआधी आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की 'विजेता' (Vijeta) हा माधवचा नवाकोरा चित्रपट असणार आहे. विशेष म्हणजे हा सिनेमा म्हणजे बॉलिवूडचे शो मॅन सुभाष घई (Subhash Ghai) यांच्या मुक्ता आर्टस् (Mukta Arts) या निर्मिती संस्थेच्या बॅनर खाली बनणार आहे.
अमोल शेडगे दिगदर्शित विजेता या सिनेमामध्ये माधव हा मुख्यवर्ती भूमिकेत पाहायला मिळणार आहे. नुकताच माधवच्या विजेता सिनेमाचा मुहूर्त झाला असून चित्रीकरणालाही सुरूवात झाली आहे. माधव सह या सिनेमात मराठी सिनेसृष्टीतील सुबोध भावे , पुजा सावंत, सुशांत शेलार हे अन्य कलाकार मंडळी देखील पाहायला मिळणार आहेत.
माधव देवचके पोस्ट
View this post on Instagram
दरम्यान, माधवने आपल्याला मिळालेल्या या इतक्या मोठया संधीचे श्रेय बिग बॉसच्या शो ला दिले आहे. याविषयी सांगताना माधव म्हणतो की, “बिग बॉस केल्यानंतर लगेचच सुभाष घईंसारख्या मोठ्या फिल्ममेकरचा सिनेमा मिळाला, हे भाग्यच म्हणायला हवे. आजवर त्यांचे सुपरडूपर हिट सिनेमे पाहतच मी लहानाचा मोठा झालोय. आणि आता त्यांच्या मुक्ता आर्ट्सच्या बॅनरच्या चित्रपटात काम करायला मिळणं, हे जणू स्वप्नच आहे. (माधव देवचक्के याला विजेता करण्यासाठी राखी सावंत हिचे चाहत्यांना वोट अपील (Watch Video)
याशिवाय “बिग बॉसचे फिल्मसिटी मध्ये असणारे घर आपल्यासाठी लकी आहे असे देखील माधव म्हणाला. याआधी याच जागेवर माधवच्या 'हमारी देवरानी' आणि 'सरस्वती' या दोन सुपरहिट मालिकांचे सेट होते. हमारी देवरानी, सरस्वती आणि बिग बॉस मुळे माधवने आपल्या आयुष्याला कलाटणी दिली असेही तो म्हणतो.