
सुप्रसिद्ध अभिनेता, गायक आणि अँकर राजीव खंडेलवाल याने त्याच्या आयुष्यातील संघर्षाची कथा हटके आणि मनोरंजक पद्धतीने 'फायर वर्क इंडिया' नावाच्या एका नवीन सोशल मीडिया अॅपद्वारे प्रेक्षकांसमोर आणली आहे. पडद्यावरच्या आणि पडद्यामागच्या राजीव खंडेलवालची कहाणी प्रत्यक्षात किती खडतर होती याचा उलगडा त्याने या अॅपवर छोट्या छोट्या व्हिडिओमधून केला आहे. अभिनय कारकीर्दीत माझ्या अनेक छटा प्रेक्षकांना दिसल्या आहेत परंतु माझी कारकीर्द यशस्वी होण्यामागे प्रचंड संघर्ष होता. तसेच हाच संघर्ष आज माझ्या यशाचा महत्त्वाचा दुवा आहे. आयुष्याच्या सुरुवातीच्या काळात मी स्टेजवर अनेकदा नापास झालो. मात्र, माझ्या स्वप्नांप्रती मी कटिबद्ध राहण्याचे ठरवले, असे त्याने या व्हिडिओत त्याने म्हटले आहे.
आपल्या संघर्षाच्या कथेसोबतच स्वतःच्या अनुभवाच्या आधारे अभिनय क्षेत्रात नव्याने येणाऱ्या इच्छुकांना त्याने मार्गदर्शनहि केले आहे. इतर कोणावरही अवलंबून न राहता स्वतःच्या क्षमतांवर अवलंबून राहण्याचा सल्ला नवोदितांना त्याने दिला आहे.राजीव सांगतो कि, त्याला त्याच्या प्रेक्षकांना एक कथा सांगायची आहे आणि त्यासाठी हे अनोखे अॅप अंत्यंत प्रभावी माध्यम आहे. सध्याच्या अनेक शॉर्ट व्हिडिओ अॅपसपेक्षा या अॅपमधील वैशिष्ट्ये उत्कृष्ट, अद्वितीय आणि सुरक्षित आहेत ज्यामुळे फायरवर्क इंडिया अॅपवर माझ्या आयुष्यातील गोष्टीं प्रेक्षक आणि माझ्या चाहत्यांसोबत शेअर करण्यास मी उत्सुक आहे. हे देखील वाचा- सनी लियोन चा स्विमिंग पूलमधील झोपलेला हा हॉट लूक ठरला चर्चेचा विषय, काळ्या बिकिनीमधील बोल्ड लूक सोशल मिडियावर व्हायरल
सोशल मीडिया अॅप फायरवर्क आता भारतातही लाँच करण्यात आले आहे आणि यावर एका बॉलिवूड अभिनेत्याने आपल्या आयुष्यातील संघर्षाचा खुलासा केला आहे. 30 सेकंदाच्या छोट्या छोट्या व्हिडिओंमधून अतिशय मनोरंजकपणे अभिनेता राजीवने आपल्या आयुष्याचे अनेक पैलू उलगडले आहेत. अशा प्रकारच्या व्हिडिओमधून युजर्सना कर्तृत्व आणि चिकाटीच्या कथांसहित प्रेरित करण्याचा फायरवर्क अॅपचा उद्देश आहे. फायरवर्क अकाउंटवरुन युजर्स राजीवशी थेट संवादही साधू शकतात.