अभिनेता रणवीर सिंगच्या 'Jayeshbhai Jordaar' चित्रपटातून दाक्षिणात्य अभिनेत्री शालिनी पांडे करतेय बॉलिवूडमध्ये पदार्पण
Shalini Pandey And Ranveer Singh ({PC - File Image)

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगच्या (Ranveer Singh) 'जयेशभाई जोरदार' (Jayeshbhai Jordaar) या चित्रपटाचे पोस्टर काही दिवसांपूर्वी लाँच करण्यात आले होते. या चित्रपटात रणवीर सिंग मुख्य भूमिका साकारणार आहे. परंतु, आतापर्यंत या चित्रपटात रणवीरसोबत कोणती अभिनेत्री मुख्य भूमिका साकारणार हे गुलदस्त्यात होते. मात्र, आता या अभिनेत्रीचं नाव समोर आलं आहे. 'अर्जुन रेड्डी' या प्रसिद्ध तेलगू चित्रपटातील अभिनेत्री शालिनी पांडे (Shalini Pandey) या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. दरम्यान, हिंदुस्तान टाइम्सला प्रतिक्रिया देताना शालिनीने सांगितले की, मी रणवीरसोबत बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे, ही माझ्यासाठी आनंदाची बाब आहे. रणवीर हा बॉलिवूडमधील आघाडीचा अभिनेता आहे. त्यामुळे त्याच्यासोबत काम करण्यासाठी मी अतिशय उत्सुक आहे, असंही शालिनी म्हणाली.

'जयेशभाई जोरदार' या चित्रपटासाठी शालिनीने ऑडिशनही दिली आहे. सध्या शालिनीचं वय 25 वर्ष आहे. शालिनीने आपल्या करिअरची सुरूवात तेलगू चित्रपटसृष्टीत प्रवेश करून केली. या चित्रपटात रणवीर एका गुजराती मुलाची भूमिका साकारणार आहे. विशेष म्हणजे या भूमिकेसाठी रणवीरने आपलं वजन कमी केलं आहे. रणवीरने आतापर्यंत सर्वच चित्रपटात दमदार भूमिका केल्या आहेत. त्यामुळे जयेशभाई जोरदार चित्रपटात रणवीरला पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. (हेही वाचा - दिग्दर्शक अभिजित देशपांडेंनी केली 'पावनखिंड' चित्रपटाची घोषणा; बाजीप्रभू देशपांडे यांच्या संघर्षमय जीवनाचा प्रवास उलगडणार)

 

View this post on Instagram

 

A grateful heart🙏🏽

A post shared by Shalini (@shalzp) on

शालिनीने दाक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडा याच्या 'अर्जून रेड्डी' चित्रपटात मुख्य अभिनेत्रीची भूमिका साकारली होती. या चित्रपटात शालिनीने उत्तम भूमिका केली. शालिनीने आतापर्यंत केवळ तेलगु नव्हे तर तमिळ चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका पार पाडल्या आहेत.