दिग्दर्शक अभिजित देशपांडे (Abhaijit Deshpande) यांनी 'पावनखिंड' (PaavanKhind Movie) या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. देशपांडे यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून यासंदर्भात माहिती दिली. या चित्रपटातून सिद्धीच्या वेढ्यातून निसटलेले महाराज सुखरुप विशाळगडावर पोहोचावे म्हणून आपल्या प्राणाची बाजी लावणाऱ्या बाजीप्रभू देशपांडे यांचा जीवनप्रवास उलगडणार आहे. आता प्रेक्षकांना 'तानाजी' चित्रपटानंतर 'पावनखिंड' चित्रपटाच्या माध्यमातून बाजीप्रभू देशपांडे यांची कामगिरी पाहता येणार आहे. पुढील वर्षी दिवाळीत हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
बाजी प्रभू यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना सुखरूप गडावर पोहोचेपर्यंत पावनखिंड लढवली होती. या चित्रपटातून आता पावनखिंडीत त्यावेळी घडलेला थरार पाहता येणार आहे. अभिजित देशपांडे यांनी 2013 मध्ये या चित्रपटाची कथा लिहिली होती. परंतु, त्यांनी या चित्रपटाआधी 'आणि काशिनाथ घाणेकर' हा चित्रपट अगोदर केला. (हेही वाचा - Tanhaji Marathi Trailer: 'अजय देवगण' ची मुख्य भूमिका असलेल्या तानाजी सिनेमाचा मराठमोळा ट्रेलर रसिकांच्या भेटीला)
Death keeps no Calendar. But not when Baji keeps a Watch. This is the story of iron warriors Baji Prabhu Deshpande & Veer Shivaji. And a night that changed Maratha History. The makers of Ani... Dr. Kashinath Ghanekar present to you the immortal legend of Paavan Khind. Diwali 2020 pic.twitter.com/Pxi6rnntkP
— Abhijeet Deshpande (@unbollywood) December 10, 2019
अभिजित देशपांडे नवीन वर्षातील फेब्रुवारी महिन्यापासून 'पावनखिंड' चित्रपटाचे चित्रीकरण सुरू करणार आहेत. या चित्रपटाचे चित्रीकरण महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली आणि पन्हाळा याठिकाणी होणार आहे. सर्वच प्रेक्षकांना या चित्रपटाविषयी उत्सुकता लागली आहे.