Tanhaji Marathi Trailer: 'अ‍जय देवगण' ची मुख्य भूमिका असलेल्या तानाजी सिनेमाचा मराठमोळा ट्रेलर रसिकांच्या भेटीला
Ajay Devgn in Tanhaji The Unsung Warrior (Photo Credits: Twitter)

Tanhaji: The Unsung Warrior या अजय देवगणच्या आगामी चित्रपटाचा हिंदी भाषेतील ट्रेलर नंतर या सिनेमाचा मराठी ट्रेलर देखील रसिकांच्या भेटीला आला आहे. आज (10 डिसेंबर) अजय देवगण, काजोल यांनी या खास मराठमोळ्या ट्रेलरला ट्वीटरवरून शेअर केलं आहे. सोबतच काजोलने मराठी भाषेत ट्वीट करत त्याची झलक रसिकांसोबत शेअर केली आहे. काही दिवसांपूर्वी 'तानाजी' सिनेमा मराठी भाषेमध्ये रीलीज केला जाणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. त्यामुळे आता खास मराठी भाषेतील तानाजी सिनेमाचा ट्रेलर देखील रसिकांसाठी आकर्षण ठरत आहे. (हेही वाचा - Shankara Song in Tanhaji: तान्हाजी चित्रपटातील पहिले गाणे 'शंकरा रे शंकरा गाणे प्रदर्शित', अजय देवगण धरला नृत्यदिग्दर्शक गणेश आचार्यच्या तालावर ठेका, Watch Video)

तानाजी सिनेमा हा 10 डिसेंबर दिवशी रीलीज होणार आहे. या सिनेमामध्ये अजय देवगण शूरवीर तान्हाजी मालुसरे यांच्या मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तर या सोबतच काजोल, सैफ अली खान, शरद केळकर यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका असणार आहेत. या चित्रपटात सैफ अली खान खलनायकाच्या भूमिकेत दिसणार असून शरद केळकर छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे. मराठमोळा दिग्दर्शक ओम राऊत याने दिग्दर्शन केलं आहे. Tanhaji: The Unsung Warrior Trailer out: जाणून घ्या अभिनेता अजय देवगण साकारत असलेल्या वीर योद्धा तानाजी मालुसरे यांच्या बद्दल '10'आश्चर्यकारक गोष्टी.

तानाजी सिनेमाचा मराठामोळा ट्रेलर

तानाजी सिनेमात काजोल आणि अजय ही जोडी मराठमोळ्या अंदाजात दिसणार आहे. दरम्यान काजोलच्या मराठी अंदाजाचं सोशल मीडियामध्ये मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे. तानाजी सिनेमामध्ये छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यासाठी सरदार तानाजी मालुसरे यांनी जीवाची बाजी लावत कोंढाणा किल्ला जिंकायला मदत केली. तो पराक्रम ओम राऊत 'तान्हाजी..' सिनेमातून पहिल्यांदाच रसिकांच्या भेटीला येणार आहे.