अर्जुन कपूर ने फनी व्हिडिओ शेअर कसून सांगितली लॉकडाउनमध्ये क्रिकेटप्रेमींची स्थिती, विराट कोहलीला टॅग करून विचारला 'हा' प्रश्न (Watch Video)
अर्जुन कपूर आणि विराट कोहली (Photo Credit: Getty)

बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूरने (Arjun Kapoor) इन्स्टाग्रामवर एक मजेदार व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये एक व्यक्ती लॉकडाउन (Lockdown) असल्याने एकटा क्रिकेट खेळताना दिसत आहे तर बॅकग्राउंडमध्ये मेरे हालात ऐसे हैं कि मैं कुछ कर नहीं सकता' हे गाणे ऐकू येत आहे. लॉकडाउन दरम्यान अर्जुन सध्या सोशल मीडियावर खूप सक्रिय आहेत. तो अनेकदा त्याचे फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसह शेअर करतो. त्याने नुकतंच एक मजेदार व्हिडिओ शेअर केला ज्यामध्ये त्याने भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला (Virat Kohli) टॅग केले. व्हिडिओमध्ये एक क्रिकेट प्रेमी सेल्फ-क्वारंटाइनमध्ये कसा एकटा क्रिकेट खेळतो हे दर्शवले आहे. अर्जुनने कोहलीला टॅग केले आणि तुमची परिस्थितीही यासारखी बनली आहे का असे विचारले आहे. अर्जुनने शेअर केलेला हा व्हिडिओ बर्‍याच लोकांना आवडला आहे. देशातील कोरोनाविरूद्ध बचावाच्या दृष्टिकोनातून लॉकडाउन करण्यात आले आहे त्यामुळे खेळाचे कोणतेही आयोजन केले जात नाही. (लॉकडाउन काळात पत्नी अनुष्का शर्मासाठी डायनासोर बनला विराट कोहली, पाहा मजेदार व्हायरल Video)

इशाकजादे अभिनेत्याने भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार याला विराटला विचारले की आपलीही स्थिती अशीच आहे का? त्याने लिहिले, “आता सर्व क्रिकेटप्रेमी स्थिती. विराट कोहलीआपलीही स्थिती अशीच आहे का?” पाहा क्रिकेटचा हा हटके व्हिडिओ:

दरम्यान, कोरोना व्हायरसच्या प्रसारामुळे कोणतेही क्रिकेट सामने आयोजित केले जात नाहीत. तथापि, विराट क्वारंटाइनयामध्ये असूनही त्याच्या सराव सत्रांना ब्रेक देत नाही. काही दिवसांपूर्वी तो पत्नी अनुष्का शर्मासोबत इमारतीच्या बाहेर क्रिकेट खेळताना दिसला होता. दोघांचा क्रिकेट खेळतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगला व्हायरल झाला होता. यापूर्वी अनुष्काने क्रिकेटरचा एक मजेदार व्हिडिओ शेअर केला होता, ज्यामध्ये तो डायनासोरचे अनुकरण करताना दिसला. दुसरीकडे, अर्जुन अखेर 'पानिपत'मध्ये मोठ्या पडद्यावर दिसला होता. त्याचा पुढील चित्रपट, संदीप और पिंकी फरार 20 मार्च रोजी प्रदर्शित होणार होता पण कोरोना व्हायरसमुळे तो पुढे ढकलण्यात आला. चित्रपटाच्या नवीन प्रदर्शनाची तारीख अद्याप जाहीर केलेली नाही.