बिग बॉसमध्ये भूकंप  : प्रेमाच्या परीक्षेत जसलीन नापास; अनुप जलोटांनी घेतला ब्रेकअप करण्याचा निर्णय
अनुप जलोटा आणि जसलीन मथारू (Photo Credits: Facebook)

बिग बॉसमधील सर्वात चर्चित जोडी म्हणून अनुप जलोटा आणि जसलीन मथारूकडे पहिले जाते. बिग बॉसमध्ये आल्यानंतर लगेच त्यांनी स्वतःच्या नात्याचा सर्वांसमोर खुलासा केला, आणि ही जोडी ट्रोल व्हायला सुरुवात झाली. मात्र याचा फायदा बिग बॉसलाच झाला. या जोडीची केमिस्ट्री पाहण्यासाठीच कित्येकांनी बिग बॉस पाहायला सुरुवात केली. मात्र यांच्यामधील वयाच्या अंतरामुळे या नात्याचे आयुष्य लवकरच संपेल अस अनेकांनी भाकीत वर्तवले होते, त्यात राखी सावंतही होती. आता खरेच असे घडताना दिसत आहे. या बिग बॉसच्या रंगमंचावर खरच अनुप-जसलीनच्या नात्याला ग्रहण लागताना दिसून येत आहे. लवकरच या दोघांच्या नात्याची परिणीती 'ब्रेकअप'मध्ये होताना दिसून येईल.

नुकत्याच पार पडलेल्या नॉमिनेशन टास्कमध्ये एक सिंगल कंटेस्टंट कुण्या एका जोडीदाराला जायबंदी करणार होता. त्याला सोडवण्यासाठी त्याच्या जोडीदाराला सिंगल कंटेस्टंट सांगेल त्या वस्तूचा त्याग करणे बंधनकारक होते. या टास्कमध्ये दीपिका कक्कडने अनूप जलोटा यांनी बंदी बनवले आणि यांच्या सुटकेच्या बदल्यात जसलीनला तिचे सगळे कपडे, मेकअप त्याग करण्यास तसेच केस कापण्यासही सांगितले. एक कलाकार या नात्याने कपडे किती महत्त्वाचे आहेत, हे तिने दीपिकाला समजावण्याचा प्रयत्न केला. पण दीपिका आपल्या म्हणण्यावर ठाम होती. अखेर जसलीनने कपड्यांचा त्याग करण्यास व केस कापण्यास नकार दिला, झाले, हीच गोष्ट अनूप यांच्या मनाला लागली. व त्यांनी 'तू माझ्यासाठी कपड्यांचा त्याग करू शकत नाहीस?' असा प्रश्न त्यांनी जसलीनला केला़.

या नाट्यमय घटनेनंतर अनुप जलोटा यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे ज्यामध्ये ते जसलीनसोबत ब्रेकअप करण्याचा निर्णय जाहिर करत आहेत. 'जसलीनच्या वागण्याने मी फार दुखावलो आहे, तिच्या जागी मी असतो तर मी माझे कपडे लगेच त्याग केले असते. टास्कमध्ये फक्त कपडे मागितले होते, जीव तर नाही ना. त्यामुळे आता या नात्याचा मी इथच शेवट करत आहे' असे सांगताना दिसतात.

आता जसलीन अनुपजींना समजावेल का? आणि अजूप आपला निर्णय बदलतील का? हे पाहणे उत्सुकाचे ठरणार आहे.