साऊथ सुपरस्टार राम चरण (Ram Charan) आज मुंबई मध्ये प्रभादेवी स्थित सिद्धिविनायकाच्या दर्शनाला (Siddhivinayak Temple) पोहचला होता. यावेळी तो एअरपोर्ट पासूनच विना चप्पल दिसला. त्याचे काळे कपडे घालून बाप्पाचं दर्शन घेणं हे सारं चर्चेचं कारण ठरलं आहे. दरम्यान यामागे त्याची अयप्पा दीक्षा आहे. यापूर्वी देखील रामचरण अशाप्रकारे काळे कपडे घालून विना चप्पल फिरताना दिसला आहे. लवकरच राम चरण कियारा अडवाणी सोबत 'गेम चेंजर' मध्ये दिसणार आहे. या सिनेमाला घेऊन सध्या अनेक चर्चा रंगत आहेत अशात त्याची मुंबईत आज एक झलक रसिकांना पहायला मिळाली आहे.
अय्यपा दीक्षा मध्ये काय असतं?
अयप्पा दीक्षा घेणारी व्यक्ती 41 दिवस कडक उपवास आणि व्रत पाळते. यामध्ये तामसिक जीवनशैलीपासून दूर राहत सात्विक जीवनशैली स्वीकारली जाते. त्यानंतर ही व्यक्ती सबरीमाला मंदिरात दर्शनाला जाते. या काळात काळे किंवा निळे कपडे घातले जातात. राम चरण अनेक वर्ष सबरीमाला मंदिरामध्ये जात आहे. त्यापूर्वी सध्या तो विना चप्पल फिरताना दिसत आहे.
#WATCH | Maharashtra: Actor Ram Charan offered prayers at Siddhivinayak Temple in Mumbai.
(Source: Siddhivinayak Temple) pic.twitter.com/GEkTYIe9sf
— ANI (@ANI) October 4, 2023
View this post on Instagram
दरम्यान आज सकाळी राम चरण त्याच्या टीम सोबत हैदराबाद वरून मुंबईत आला. त्याचे कपडे काळे होते. खांद्यावर काळा गमछा होता. मुंबई एअरपोर्ट वरून तो सिद्धिविनायक मंदिरात पोहचला. त्याच्यासोबत राहुल कनाल देखील दर्शन घेताना उपस्थित होता. मंदिरातून निघताना राम चरणच्या गळ्यात निळी शाल दिसली.