Rajpal yadav: कॉमेडीचा बादशाह आणि हिंदी चित्रपटांमध्ये प्रेक्षकांना खळखळून हसवणारा अभिनेता राजपाल यादव यांच्या जवळील कोट्यावधी मालमत्ता बॅंकेकडून जप्त करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. बॅंकेने आरोप केला आहे की, राजपाल यादव यांनी वेळीच कर्ज फेडले नसल्यामुळे हे पाऊल उचलावे लागले. (हेही वाचा- बिग बॉस मराठी 5 च्या घरामध्ये आज 'दोन स्पेशल' पाहुण्यांच्या एंट्रीने सारे खूष ( Watch Video)
मिळालेल्या माहितीनुसार, राजपाल यादव यांनी 2010 मध्ये हे कर्ज घेतले होते. या कर्जाचे पैसे वेळेवर फेडले नाही अशी माहिती बॅंक अधिकाऱ्यांनी दिली. मुंबईतील सेंट्रल बॅंक ऑफ इंडियाचे अधिकारी दोन दिवसांपूर्वी शाहजहांपूरला पोहोचले होते. रविवारी राजपालच्या मालमत्तेवर बॅकेने बॅनर लावले. या बॅनेर असे लिहले आहे की, ही मालमत्ता सेंट्रल बॅंक ऑफ इंडिया, मुंबईची असून यावर कोणत्याही प्रकरणाची खरेदी विक्री करू नये असं त्यात लिहले आहे.
सोमवारी सकाळी सेंट्रल बॅंक ऑफ इंडिया मुंबईच्या अधिकाऱ्यांनी ही मालमत्ता गाठून ती ताब्यात घेतली आहे. अभिनेता राजपाल यादव याने २०१२ रोजी अता पता लापता चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. त्यांच्या पत्नीने राधा यादव आणि राजपाल यांनी चित्रपटाच्या निर्मितीसाठी बॅंकेकडून कर्ज काढले होते. हा चित्रपट फ्लॉप झाला त्यानंतर राजपाल यांच्यावर कर्जाचे डोंगर डोक्यावर आले. कर्ज वेळने न भरल्याने त्यांना २०१८ रोजी पोलिस कोठडी झाली.
चित्रपटासाठी त्यांनी पाच कोंटीची रक्कम बॅंकेकडून कर्ज म्हणून घेतले होते. आता बॅंक ऑफ इंडिया मुंबई वांद्रे बॅंचचे कर्ज फेडू न शकल्यामुळे त्यांची उत्तर प्रदेशातील शाहजहांपूरमधील सेठ एन्क्लेव्हम येथील संपत्ती बॅंकेने जप्त केली.