कर्नाटक: 'Man vs Wild' च्या शूटिंग दरम्यान रजनीकांत यांना दुखापत
Rajnikaanth (PTI)

मॅन व्हर्सेस वाइल्ड’ (Man vs Wild) या जगप्रसिद्ध शोमध्ये दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत (Rajnikant) यांच्या एन्ट्रीची बातमी ऐकून फॅन्सच्या उत्साहाला पारावर उरला नव्हता. मात्र आता चित्रीकरणाच्या दरम्यान रजनीकांत यांना दुखापत झाल्याची माहिती समोर येत असल्याने सर्वांच्या उत्साहाला जणू काही ग्रहण लागले आहे.रजनीकांत यांनी मात्र आपल्याला दुखापत झाली नसून काट्यांमुळे केवळ थोडे खरचटले आहे असे सांगितले आहे. त्यांनी आताच या एपिसोडचे शुटिंग पूर्ण करून चेन्नई विमानतळावर माध्यमांशी संवाद साधला. Man Vs Wild मध्ये नरेंद्र मोदी आणि बराक ओबामा यांच्यात होतं 'हे' साधर्म्य, Bear Grylls ने शेअर केला अनुभव (Watch Video)

मीडिया रिपोर्टनुसार, कर्नाटकच्या बंदिपूर जंगलामध्ये (Bandipur Forest) रजनीकांतच्या एपिसोडचं शूटिंग सुरू आहे. बंदिपूरचे जंगल हे व्याघ्र प्रकल्पासाठी राखीव आहे. अद्याप या शोच्या एपिसोडबद्दल फारशी माहिती देण्यात आलेली नाही पण नरेंद्र मोदींच्या एपिसोडप्रमाणेच रजनीकांत यांच्या एपिसोडबद्दलही रसिकांच्या आणि मॅन व्हॅर्सेस वाईल्ड शोच्या चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता आहे.

ANI ट्वीट

या पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील बेअर ग्रिल्स सोबत शो मध्ये सहभाग घेतला होता. जीम कॉर्बेटमध्ये ‘मॅन व्हर्सेस वाइल्ड’चा एपिसोड शूट करण्यात आला होता. यानंतर आता दक्षिणात्य सिनेसृष्टीसोबतच देशभरात लोकप्रिय असलेले रजनीकांत नेमकं काय करणार? याची उत्सुकता वाढली आहे.

अभिनेते रजनीकांत नुकतेच तमिळ चित्रपट 'दरबार' मध्ये झळकले होते. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर अपेक्षेनुसार मोठा गल्ला जमवला आहे. आता रजनीकांत हे Thalaivar 168 या अगामी सिनेमासाठी तयारी करत आहेत. या सिनेमामध्ये कीर्ती सुरेश, मीना आणि खुशबू झळकणार आहेत. पण त्या सिनेमापूर्वी रजनीकांत यांचा 'वाईल्ड' अंदाज त्यांच्या रसिकांसमोर येणार आहे.दरम्यान रजनीकांत यांच्या पाठोपाठ बॉलिवूडचा खिलाडी स्टार अक्षय कुमार देखील बेअर ग्रील्सच्या शोमध्ये झळकणार असल्याचं वृत्त आहे.