XUV 300 Launched: Mahindra ने लॉन्च केली धमाकेदार कार; जाणून घ्या फिचर्स आणि किंमत
Mahindra XUV 300 (Photo: Mahindra Website)

महिंद्रा एक्सयुव्ही 300 (Mahindra XUV 300) ही नवीकोरी कार 14 फेब्रुवारीला व्हेलेंटाईन डे च्या मुहुर्तावर लॉन्च झाली. लॉन्चिंग पूर्वीच कारच्या तब्बल 4 हजार बुकींग्स झाल्या आहेत. नवी XUV300 कार X100 या प्लॅटफॉर्मवर काम करेल. XUV300 कारच्या पेट्रोल वेरिएंटची किंमत 790000 रुपये तर डिझेल वेरिएंटची किंमत 849000 रुपये आहे. 'अधिक नफा मिळवा अन्यथा ट्रक परत' या दाव्यावर महिंद्राने लॉन्च केला FURIO ट्रक! पहा किंमत, फीचर्स

भारतीय बाजारात Mahindra XUV 300 ची टक्कर थेट Maruti Vitara Brezza, Tata Nexon आणि  Ford EcoSport या कार्सची होईल. मात्र XUV 300 अनेक फिचर्स या कार्सपेक्षा वेगळे आणि खास आहेत.

फिचर्स:

XUV 300 माइलेज

एक्सयूव्ही 300 कारच्या पेट्रोल वेरिएंटचे मायलेज 17 किलोमीटर प्रती लीटर आहे. तर डिझेल वेरिएंटचा मायलेज 20 किलोमीटर प्रती लीटर आहे.

XUV 300 इंजिन

महिंद्रा एक्सयूव्ही 300 यात दोन इंजिनचे पर्याय आहेत. यात एक 1.5 लीटर डिझेल इंजिन असेल. ज्यात 117 हॉर्सपावरची क्षमता असेल. यात इंजिन 6 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्ससोबत असेल. तर दुसरे 110 हॉर्सपावर क्षमता असलेले 1.2 लीटर टर्बो पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. कारमध्ये ड्युअल जोन क्लाईमेट कंट्रोल, फ्रंट पार्किंग सेंसर, स्टीअरिंग मोड इत्यादी फिचर्स देण्यात आले आहेत. या कार मध्ये 2600 एमएमचा सर्वात मोठा व्हिलबेस देण्यात आला आहे.

किंमती:

Mahindra XUV300 Variants Petrol Diesel
W4 Rs 7.9 Lakh Rs 8.49 Lakh
W6 Rs 8.75 Lakh Rs 9.30 Lakh
W8 Rs 10.25 Lakh Rs 10.80 Lakh
W8 (O) Rs 11.44 Lakh Rs 11.99 Lakh

 

या कारबद्दल ग्राहक बरेच उत्सुक असून सुमारे 60 हजार लोकांनी या कारची माहिती मिळवण्यासाठी चौकशी केली आहे.