'अधिक नफा मिळवा अन्यथा ट्रक परत' या दाव्यावर महिंद्राने लॉन्च केला FURIO ट्रक! पहा किंमत, फीचर्स
Mahindra FURIO (Photo Credits: mahindratruckandbus.com)

Mahindra FURIO: महिंद्रा कंपनीच्या ट्रक अ‍ॅन्ड बस डिव्हिजनकडून आज फुरिओ (FURIO) या नव्या गाडीची घोषणा करण्यात आली आहे. इंटरमिजिएट कमर्शिअल व्हेईकल ( Intermediate Commercial Vehicles) या रेंजमधील या ट्रकचं खास वैशिष्ट्य म्हणजे 'अधिक नफा मिळवा अन्यथा ट्रक परत' (More Profit or Truck Back)  असा या दाव्यावर या ट्रकची विक्री होणार आहे.

फुरिओ हा महिंद्राचा ट्र्क भारतभर विक्रीसाठी खुला असेल. पुणे एक्स शोरूम किंमतीनुसार या ट्रकची किंमत 17.45 लाखापासून पुढे असेल. FURIO12 19ft HSD आणि FURIO14 19ft HSD असे या ट्रकमध्ये दोन व्हेरिएंट उपलब्ध आहेत. त्याच्या किंमती अनुक्रमे 17.45 आणि 18.10 लाख रूपये इतकी असेल. नक्की वाचा:  नव्या गाडीला नाव सुचवा आणि जिंका 2 कार्स; आनंद महिंद्रा यांची ट्विटवरुन ऑफर

महिंद्रा फुरिओ बाजारात आणण्यापूर्वी त्यावर अनेक इंजिनिअर्सची मेहनत आहे. मागील 4 वर्ष सुमरे 500 हून इंजिनिअर्स यावर काम करत आहेत. 180 सप्लायर्सनी 600 कोटीहून अधिक रूपयांची गुंतवणूक केली आहे. फुरिओ पहिल्यांदा 5 वर्ष / 5 लाख किमी फ्री मेंटेनन्स गॅरेंटी देणात आहे. सोबतच 5 वर्ष/ 5 लाख किमी ट्रान्सफरेबल वॉरंटीदेखील देणार आहे.