World's Fastest Train: चीनमध्ये सुरु झाली जगातील सर्वात वेगवान Maglev Train; एका तासात पार करणार 620 किमी अंतर (Watch Video)
Maglev train in China (Photo Credits: Twitter)

जसजसे काळ प्रगती करत आहे तसतसे जग आधुनिकतेच्या शिखरावर पोहोचत आहे. मंगळवारी चीनने (China) आपली हाय स्पीड मॅग्लेव्ह ट्रेन (High Speed Maglev Train) सुरू केली. या ट्रेनचे महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे याचा वेग. या ट्रेनचा कमाल वेग 620 किमी प्रतितास आहे. अहवालांनुसार, पृथ्वीवर जर कोणते वेगवान वाहन (World's Fastest Train) असेल तर ते चीनची मॅग्लेव्ह ट्रेन आहे. चीनची सरकारी वृत्तसंस्था शिन्हुआच्या मते, 20 जुलै 2021 रोजी चीनच्या किनारपट्टीवरील शिंगॉन्ग प्रांताच्या किंगदाओ येथे सार्वजनिकपणे हाय-स्पीड मॅग्लेव्ह ट्रेनची सेवा सुरू करण्यात आली.

या प्रकल्पाचे मुख्य अभियंता डिंग संसन म्हणाले की, मॅग्लेव्ह ट्रेनला 10 डबे जोडले जाऊ शकतात. या प्रत्येक कोचमध्ये 100 प्रवाशांची क्षमता असेल. ही ट्रेन 1500 किमीच्या परिघामध्ये प्रवास करण्यासाठी उत्तम पर्याय आहे. पारंपारिक गाड्यांप्रमाणेच मॅग्लेव्ह रेल्वेची चाके रेल ट्रॅकच्या संपर्कात येत नाहीत. ही ट्रेन 620 किमी प्रतितास वेगाने धावू शकते. हा वेग उच्च तापमान सुपरकंडक्टिंग पॉवरद्वारे प्राप्त केला गेला आहे.

एका अहवालानुसार या ट्रेनचा प्रोटोटाइप 2019 मध्ये बनवण्यात आला होता. त्याची यशस्वी चाचणी जून, 2020 मध्ये झाली. 2003 साली देशातील सर्वात वेगवान ट्रेन मॅग्लेव्ह सुरु झाली होती. याचा कमाल वेग 431 किमी प्रतितास आहे. ताशी 620 किलोमीटर वेगाने धावणारी मॅग्लेव्ह ट्रेनद्वारे बीजिंग ते शांघाय हा प्रवास पूर्ण करण्यासाठी 2.5 तास लागतील. हे अंतर 1000 किलोमीटरचे आहे. त्या तुलनेत, विमानाने या प्रवासासाठी 3 तास आणि हाय-स्पीड रेल्वेने 5.5 तास लागतील. (हेही वाचा: दुबईमध्ये विकले जात आहे जगातील सर्वात महागडे आईस्क्रीम; होत आहे 23 कॅरेट सोन्याचा वापर, जाणून घ्या किंमत (Watch Video))

पुढच्या वर्षी चीनची राजधानी बीजिंगमध्ये हिवाळी ऑलिम्पिक आहेत. यामुळे चीनला अधिकाधिक पायाभूत सुविधा विकसित करावयाची आहेत. चीनमध्ये, एक लहान मॅग्लेव्ह लाइन आहे जी शहराच्या विमानतळावरून शहराकडे जाते. चीनमध्ये अद्याप कोणत्याही आंतर-प्रांत किंवा आंतर-शहर मॅग्लेव्ह लाइन नाहीत,