देशभरात कम्यूटर सेगमेंट मधील बाइक्स सध्या अधिक विक्रीसाठी उपलब्ध करुन दिल्या जात आहेत. सेल वाढवण्यासाठी वाहन निर्माती कंपनी सातत्याने या बाइक्स अधिक आकर्षक आणि उत्तम मायलेज लैस करतात. त्यामुळे तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीच्या बाइकच्या शोधात असाल तर आकर्षक दिसण्यासह शिखाला परवडेल अशा किंमतीत उपलब्ध आहेत.याच संदर्भात आम्ही तुम्हाला अधिक माहिती देणार आहोत. ज्यावर जानेवारी महिन्यात खास फायनान्स ऑफर दिला जात आहे.(TVS Jupiter चे कंपनीने लॉन्च केले सर्वात स्वस्त वेरियंट, खास फिचर्ससह जाणून घ्या किंमतीबद्दल अधिक)
TVS Sports ही त्यापैकीच एक असून भारतीय बाजारात दोन वेरियंट्समध्ये उपलब्ध आहे. ज्याची किंमत 56,100 रुपयांपासून सुरु होते. जी याच्या किक स्टार्ट वेरियंचीच आहे. त्याचसोबत याच्या सेल्फ स्टार्ट वेरियंटची किंमत 62,950 एक्स दिल्ली शो रुम किंमत आहे. कंपनीने गेल्या वर्षात नव्या उत्सर्जन मानक BS6 सह अपडेट केले होते. त्यानंतर पहिल्यांदाच याच्या किंमतीत वाढ झाली आहे.
कंपनीकडून सोशल मीडियात या बाइकचा एक फोटो शेअर केला गेला आहे. त्यामध्ये 100 टक्के फायनान्सच्या सुविधेबद्दल सांगितले गेले आहे. व्याजदर ही अत्यंत कमी 6.99% ठेवला आहे. म्हणजेच जर TVS Sport खरेदी करायची असल्यास तुम्हाला अधिक पैसे द्यावे लागणार नाहीतच त्याचसोबत अधिक व्याज दर द्यावा लागणार नाही. या ऑफर व्यतिरिक्त कंपनी या बाइकवर 5 हजार रुपयांचा कॅशबॅक आणि ग्राहकांना 1555 रुपयांच्या EMI चा ऑप्शन ही देत आहे.(Maruti WagonR आणि Ignis सारख्या दमदार गाड्या आता भाड्याने चालवता येणार, 12 हजारांपासून EMI सुरु)
टीवीएस स्पोर्ट्स बाइकमध्ये कंपनीने 109.7CC ची क्षमता असलेले सिंगल सिलिंडर युक्त एअर कूल्ड इंजिनचा वापर केला आहे. जी 8.29bhp ची पॉवर आणि 8.7Nm चा टॉर्क जनरेट करणार आहे. हे इंजिन 4 स्पीड गिअरबॉक्सह जोडले गेले आहे. याची टॉप स्पीड 90 किमी प्रतितास आहे. मायलेज बद्दल बोलायचे झाल्यास कंपनीने दावा केला आहे की, ही बाइक 75 ते 80 किमी प्रतिलीटर पर्यंत मायलेज देणार आहे. याच कारणास्तव याचे नाव बेस्ट मायलेजसाठी एशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये दाखल करण्यात आले आहे.