Maruti WagonR आणि Ignis सारख्या दमदार गाड्या आता भाड्याने चालवता येणार, 12 हजारांपासून EMI सुरु
2019 Maruti Suzuki WagonR (File Photo)

देशातील सर्वाधिक मोठी वाहन निर्माती कंपनी मारुती सुजुकीने भारतात आपल्या सब्सक्रिप्शन प्रोग्राममध्ये WagonR, Ignis, S-Cross सुद्धा सहभागी करण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजेच आता लोकप्रिय गाड्या डाऊनपेमेंट शिवाय खरेदी करता येणार आहेत. या प्रोग्राम अंतर्गत वॅगनआर 48 महिन्यांच्या कालावधीत प्रति महिना 12,722 रुपयांच्या सुरुवाती किंमतीवर तर इग्निस सिग्मा ही 13,722 रुपयांच्या महिन्याच्या पेमेंटवर याचा वापर केला जाऊ शकतो. या किंमती दिल्लीतील असून त्यात टॅक्सचा सुद्धा समावेश आहे.(Maruti Suzuki Swift चे लिमिटेड ॲडिशन लॉन्च, जाणून घ्या किंमतीसह खासियत)

ऑटोमेकर मारुती सुजुकीने वॅगनआर, इग्निस आणि एस. क्रॉसचा यामध्ये समावेश केला आहे. यामध्ये सर्वात प्रथम मारुती सुजुकी विटारा ब्रेजा, स्विफ्ट, डिझायनर, अर्टिगा, बलेनो, सियाज आणि एक्सएल 6 चा समावेश आहे. मारुती सुजुकी सदस्यतेचा कार्यक्रम सध्या दिल्ली एनसीआर, बंगळूरू, हैदराबाद, पुणे, मुंबई, चैन्नईत उपलब्ध आहे. मारुती सब्सक्रिप्शन प्रोग्राम हा ज्या लोकांना नवी कार खरेदी करायची असते त्यांच्यासाठी उत्तम मानला जातो.

तर मारुती सुजुकी लवकरच एक नवी इलेक्ट्रिक बाइक लॉन्च करणार आहे.  सुजुकी बर्गमॅन  असे  त्याचे नाव असून   इलेक्ट्रिक भारतीय बाजारात सुजुकीचे पहिले ईवी वाहन असणार आहे. या स्कूटरमधून IC-engined मॉडेलची स्टाइल पुढे वाढवली जाईल. गेल्या वर्षात सुजुकीने इलेक्ट्रिक स्कूटर सेगमेंट मध्ये उतरवण्याचा निर्णय घेतला होता. रिपोर्ट्स मते, या इलेक्ट्रिक स्कूटरला 100 ते 1200 किमी रेंजसह लिथियम आयन बॅटरी दिली जाण्याची शक्यता आहे.(Maruti, Hyundai आणि Mahindra च्या गाड्या 1 जानेवारी पासून महागणार, जाणून घ्या कारण)

यामध्ये कंपनी फ्रंट डिस्क ब्रेक, संपूर्ण डिजिटल इंस्ट्रुमेंट कंसोल, अलॉय व्हिल आणि ट्युबलेस टायर सारखे फिचर्स दिले जाऊ शकतात. अशी अपेक्षा केली जात आहे की, सुजुकी इलेक्ट्रिक स्कूटर मध्ये स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी आणि डेडिकेटेड अॅप पेक्षा लैस असणार आहे. सुजुकी बर्गमॅन इलेक्ट्रिक स्कूटरची टॉप स्पीड 80kmph असणार आहे. तर ही 4 सेकंदात 0 ते 40kmph पर्यंतचा स्पीड पकडण्यास सक्षम असणार आहे