TVS Jupiter चे कंपनीने लॉन्च केले सर्वात स्वस्त वेरियंट, खास फिचर्ससह जाणून घ्या किंमतीबद्दल अधिक
टीवीएस ज्युपिटर (Photo Credits-Twitter)

टीवीएस मोटर्स इंडियाने (TVS Motors India) भारतीय बाजारात आपली लोकप्रिय स्कूटर Jupiter च्या लाइनअप मधील नवीन वेरियंट लॉन्च केले आहे. त्याला Sheet Metal Variant असे नाव दिले आहे. कंपनीचे हे नवे वेरियंट नव्या बेस मॉडेलचे आहे. ज्याची किंमत 63,497 रुपये एक्स शोरुम आहे. नव्या टीवीएस ज्युपिटर शीट मेटल व्हाइट वेरियंट दोन रंगाच्या ऑप्शनमध्ये उतरवण्यात आली आहे. ज्यामध्ये मेटालिक सिल्वर आणि मेटालिक टायटेनियम ग्रे चा समावेश आहे.(Electric Tractor: सोनालिकाने भारतामध्ये सादर केला देशातील पहिला इलेक्ट्रिक ट्रॅक्टर; जाणून घ्या फीचर्स आणि किंमत)

स्कूटरच्या नव्या बेस वेरियंटमध्ये कंपनी सध्या 110 सीसी सिंगल सिलेंडर एअर कूल्ड इंजिनचा वापर केला आहे. जो 7500rpm वर 74bhp ची पॉवर आणि 5500rpm वर 8.4Nm चा पीक टॉर्क जनरेट करणार आहे. त्याचसोबत इंजिन सीवीटी गिअरबॉक्ससह जोडले जाणार आहे. नव्या बेस वेरियंटमध्ये दोन रायडिंग मोड्स सोबत ब्रँन्डच्या इकोनॉमिटरचे पेटेंट करण्यात आले आहे.(Aprilia SXR 160 मॅक्सी स्कूटर भारतात लॉन्च,स्पोर्टी डिझाइनसह मिळणार 'हे' दमदार फिचर्स)

यामध्ये दोन रायडिंग मोड इको आणि पॉवर दिले आहेत. या स्कूटरमध्ये स्टँडर्ड आधारावर एलईडी हेडलॅम्प, एलईडी टेललाइट्स, अपडेटेड इंस्ट्रुमेंट क्लस्टर, ओपन ग्लोव बॉक्स, मोठे बूट स्पेस, युएसबी चार्जिंग सपोर्ट पोर्ट यांचा समावेश आहे. नव्या एसएमडब्लू वेरियंट व्यतिरिक्त टीवीएस ज्युपिटर आधीपासूनच चार अन्य ट्रिम स्तरांच्या स्टँडर्ड, जेडएक्स डिस्क आणि क्लासिक मध्ये उपलब्ध आहे. ज्याची किंमतीत कंपनीला नुकतीच 2770 रुपयांचा नफा झाला आहे. नव्या वेरियंटसह संपूर्ण ज्युपिटर रेंज आता 63,497 रुपये ते 72,472 रुपये आहे.