Aprilia SXR 160 मॅक्सी स्कूटर भारतात लॉन्च,स्पोर्टी डिझाइनसह मिळणार 'हे' दमदार फिचर्स
Aprilia (Photo Credits- Twitter)

Piaggio ने भारतात आपली बहुप्रतिक्षित मॅक्सी स्कूटर Aprilia SXR 160 लॉन्च केली आहे. ही स्कूटर 1,25,997 रुपयांत खरेदी करता येणार आहे. जी बेस्ट इन क्लास फिचर्स लैस आहे. ही स्कूटर ऑटो एक्सपो 2020 दरम्यान झळकवण्यात आली होती. याच्या लॉन्चिंग बद्दल ग्राहक प्रतिक्षा करत होते. तर Aprilia SXR 160 भारतात अन्य स्कूटर पेक्षा अधिक प्रीमियम फिचर्स लैस आहे. ही एक हाय परफॉर्मेन्स स्कूटर असून पॉवरफुलसह अन्य दमदार फिचर्स ग्राहकांना मिळणार आहेत. युजर्सच्या गरजा लक्षात घेता ही बाइक तयार करण्यात आली आहे.

इंजिन आणि पॉवर बद्दल बोलायचे झाल्यास Aprilia SXR 160 मध्ये 160 cc चा सिंगल सिलेंडर इंजिन दिला आहे. जो BS6  एमिशन नॉर्म्स प्रमाणे आहे. हे इंजिन 10.9 PS ची मॅक्सिमम पॉवर आणि 11.6 Nmचा पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे.(Apple iCar: स्मार्टफोननंतर ऑटो क्षेत्रात 'ॲपल' कंपनीची उडी; घेऊन येत आहे इलेक्ट्रिक कार; जाणून घ्या काय असेल खास)

अन्य फिचर्स मध्ये SXR 160 मोठे डिजिटल इंस्ट्रुमेंट क्लस्टरसह येणार आहे. यामध्ये ग्राहकांना एवरेज स्पीड, टॉप स्पीड, फ्युल लेवल, एक्सटर्नल टेम्प्रेचर, इंस्टेंट मायलेज सह काही महत्वाच्या गोष्टीबद्दल तुम्ही अधिक जाणून घेऊ शकता. नव्या स्कूटरमध्ये रेव काउंटर ही दिला जाणार आहे. त्याचसोबत स्कूटरमध्ये मोठे डार्क फ्लाय स्क्रिन दिली आहे. तसेच स्कूटरमध्ये फेदर टच स्विच गिअर, मोठी बकेट सीट, फ्रंट लॉकेबल स्प्लिट ग्लव बॉक्स आणि युएसबी चार्जिंग सॉकेट ही दिले आहे. (Nissan कंपनीने झळकवले 2021 Kicks चे मॉडेल, नव्या डिझाइनसह मिळणार 'हे' उत्तम सेफ्टी फिचर्स)

डिझाइन आणि एक्सटर्नल फिचर्स बद्दल बोलायचे झाल्यास Aprilia SXR 160 स्कूटर मध्ये स्पोर्टी डिझाइन, फुल एलईडी लाइटिंग, एलईडी डीआरएल मिळणार आहे. या फिचर्स मुळे या  स्कूटरला अधिक मस्क्युलर लूक मिळणार आहे. या स्कूटरमध्ये शार्प पिलियन ग्रॅब रेलसह सिंगल साइड-माउंटेड एग्जॉस्ट  ही मिळणार आहे. एकूणच स्कूटर भारतात सध्याच्या स्कूटर्सला टक्कर देणार आहे.