Nissan कंपनीने झळकवले 2021 Kicks चे मॉडेल, नव्या डिझाइनसह मिळणार 'हे' उत्तम सेफ्टी फिचर्स
Nissan 2021 Kicks (Photo Credits-Twitter)

Nissan कंपनीने त्यांचे 2021 Kicks फेसलिफ्ट एसयुवी US मार्केटमध्ये झळकवली आहे. या नव्या निसान किक्समध्ये खुप बदल दिसून येणार आहे. खासकरुन लूक्स आणि इंटीरियर डिझाइनमध्ये बदलाव करण्यात आले आहेत. त्याचसोबत कंपनीने यामध्ये आणखी काही नवे फिचर्स ही दिले असल्याने अन्य SUV ला टक्कर दिली जाणार आहे. 2021 Nissan Kicks च्या पॉवरट्रेन मध्ये सुद्धा बदलाव करण्यात आलेला आहे.(नवी MPV Suzuki Solio Bandit लॉन्च, जाणून घ्या किंमतीसह खासियत)

एक्सटिरियर बद्दल बोलायचे झाल्यास या एसयुवी मॉडेलमध्ये डबल वी-मोशन फ्रंट ग्रिल, बंपर, LED हेड लाइट्स आणि एलईडी फॉग लाइट्ससह नवे रियर बंपर, LED टेल लाइट्स आणि नवे व्हिल्स डिझाइन दिसून येणार आहे. 2021 Nissan Kicks चे इंटीरियर अधिक स्टायलिश असणार आहे. यामध्ये 8 इंचाचा टच स्क्रिन डिस्प्ले, एक अॅडिशनल टाइप सी युएसबी पोर्ट, प्रीमियम फिनिश्ड सीट्स, नवे सेंटर कंसोल, आर्मरेस्ट दिले आहे. त्याचसोबत एसयुवी मध्ये ग्राहकांना Bose चे पर्सनल प्लस ऑडिओ सिस्टिम आणि एक्सक्लुजिव्ह अराउंड व्यू मॉनिटर मिळणार आहे.

अन्य फिचर्स मध्ये एसयुवीमध्येआता Apple CarPlay आणि Android Auto सपोर्ट मिळणार आहे. तसेच कारमध्ये वायफाय, रिमोट व्हिकेल कमांड ही दिले जाणार आहे. ज्यामध्ये की-लेस एन्ट्री आणि ऑटोमॅटिक कोलिजन नोटफिकेशन्सचा समावेश आहे.(Renault Kiger चा कंपनीने जाहीर केला पहिला टीझर व्हिडिओ, किंमत 6 लाख रुपये असण्याची शक्यता)

इंजिन आणि पॉवरसाठी 2021 Nissan Kicks मध्ये 1.6 लीटरचा DOHC 16 valve-4 सिलेंडर इंजिन दिले जाणार आहे. जो 122hp ची मॅक्सिमम पॉवर जनरेट करण्यास सक्षम आहे. या इंजिनसह एक्स्ट्रॉनिक ट्रान्समिशन ही जोडले गेले आहे. निसानच्या या एसयुवीमध्ये यापूर्वीपेक्षा उत्तम रियर डिस्क ब्रेक सिस्टिम, इंटेलिजेंट क्रुज कंट्रोल आणि ऑटो होल्डसह एक इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेकचा समावेश आहे. या एसयुवीला 3 फूल इक्विप्ड मॉडल्स मध्ये उतरवले जाणार आहे. त्यामध्ये Kicks S, Kicks SV आणि Kicks SR चा समावेश आहे.